'या' मराठी अभिनेत्रीचा अपघाती मृत्यू

एका गुणी आणि हरहुन्नरी अभिनेत्रीचा मृत्यू झाल्याने मराठी सिनेसृष्टीतून शोक व्यक्त केला जात आहे.

Updated: Sep 21, 2021, 04:28 PM IST
'या' मराठी अभिनेत्रीचा अपघाती मृत्यू

पणजी : पुण्यातील मराठमोळी अभिनेत्रीचा (Marathi Actress Ishwari Deshpande Death) अपघातात दुर्देवी मृत्यू झाला आहे. नवोदित अभिनेत्री ईश्वरी देशपांडेचा वयाच्या अवघ्या 25 वर्षी अपघातात मृत्यू झाला. ऐन कारकिर्दीच्या सुरुवातीला एका गुणी आणि हरहुन्नरी अभिनेत्रीचा मृत्यू झाल्याने मराठी सिनेसृष्टीतून शोक व्यक्त केला जात आहे. (Marathi Actress Ishwari Deshpande And Her Friend shubham dedge Die Car Accident in Goa)

ईश्वरीसह तिच्या मित्राचाही या अपघातात मृत्यू झालाय. शुभम देडगे असं या 28 वर्षीय मित्राचा नावं आहे. हे दोघे गोव्याला फिरायला गेले होते. या दरम्यान हा सर्व प्रकार घडला. घटना सोमवार 20 सप्टेंबरची आहे. 

नेमकं काय झालं? 

पुणेकर अभिनेत्री आणि तिचा मित्र गोव्यात फिरायला गेले होते. या दरम्यान उत्तर गोवा भागातील अरपोरा येथे खाडीत कार कोसळली. यात दोघांचा अंत झाला. हे दोघेही सकाळी 5 वाजता बागा इथील रस्त्यावरुन जात होते. शुभम गाडी चालवत होता. मात्र शुभमचं गाडीवरील नियंत्रण सुटलं.

त्यामुळे गाडी खाडीत गेली. गाडी लॉक झाली. लॉक झाल्याने दोघेही गाडीत अडकले. दोघांच्या नाकातोंडात पाणी गेलं. यामुळे दोघांचा मृत्यू झाला.  

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. सकाळी 7 वाजता  अग्निशमन दलाच्या जवानांनीही पाचारण केलं. त्या दोघांचं मृतदेह गाडीतून बाहेर काढलं, अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. 

ईश्वरीबाबत थोडक्यात 

ईश्वकीने मराठीसह हिंदी मालिकांमध्ये अभिनय केला आहे. तिने एका आगामी चित्रपटातही काम केल्याचं म्हंटलं जात आहे. मात्र आपला सिनेमा प्रदर्शित होण्याआधी अशा प्रकारे दुर्देवीरित्या मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.