अशा पद्धतीने प्रियंका - निकने आपलं नातं स्वीकारलं

हटके स्टाईलने स्वीकारलं नातं 

अशा पद्धतीने प्रियंका - निकने आपलं नातं स्वीकारलं  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि अमेरिकन सिंगर निक जोनस यांच नातं गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी हे दोघं एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा रंगली होती. आता मात्र या नात्यावर शिक्कामोर्तब झाली आहे. हे दोघे एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच इंस्टाग्रामवरून समोर आलं आहे. सध्या हे दोघेही एकमेकांच्या इंस्टा पोस्टवर कमेंट्स आणि लाइक्स करताना दिसत आहेत. 

गेल्या काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या एलए डोगर्स स्टेडियममध्ये दोघांनाही बेसबॉल मॅच पाहताना स्पॉट करण्यात आलं. यानंतर या दोघांच्या अफेअरच्या चर्चांणा उधाण आलं. एका वेबसाईटनं दिलेल्या माहितीनुसार, प्रियांका निकसोबत वेस्ट हॉलिवूडच्या टोका माडेरा नावाच्या रेस्टॉरंटमध्ये गुरुवारी रात्री ८.०० च्या सुमारास दाखल झाली होती. यावेळी प्रियांका आणि निक यांना एकमेकांसोबत बराच वेळ मनमोकळ्या गप्पा मारताना पाहिलं गेलं.

निक जोनस हा एक अमेरिकन सिंगर आणि गीतकार आहे. तो २५ वर्षांचा आहे. प्रियांकाशी त्याची भेट टीव्ही कार्यक्रमा 'क्वांटिको'च्या दरम्यान एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती. त्यानंतर या दोघांना बऱ्याचदा एकत्र पाहिलं गेलं.