प्रियंका चोप्राने निकसोबतच्या नात्याला असं स्विकारलं

काय म्हणाली प्रियंका 

प्रियंका चोप्राने निकसोबतच्या नात्याला असं स्विकारलं

मुंबई : प्रियंका चोप्रा आणि निक यांच्यात किती प्रेम आहे हे अनेकदा प्रेक्षकांनी अनुभवलं आहे. कधी हे दोघं न्यूयॉर्कच्या रेस्टॉरंटमधून हात पकडून बाहेर पडताना दिसले तर कधी एकत्र सायकल चालवताना दिसले. निकने अनेकदा आपल्या मनातील भावना प्रियंकासोबत शेअर केल्या आहे. मात्र प्रियंकाने आता स्वतः नात्यातील सत्यता शेअर केली आहे. 

प्रियंका आणि निक यांची जवळीक दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र अद्याप या दोघांनी कुठेही आपल्या नात्याबद्दल चर्चा केली आहे. असं असताना प्रियंकाने हल्लीच एका वक्तव्यावरून स्पष्ट केलं. ती म्हणाली की, हे नातं खूप खास आहे. प्रियंका म्हणाली की, आम्ही दोघं एकमेकांना ओळखून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. तसेच ती म्हणाली की निकसाठी देखील हा चांगला अनुभव आहे. अशी चर्चा आहे की, ऑगस्टच्या अखेरीपर्यंत निक - प्रियंका लवकरच साखरपुडा केला जाणार आहे. 

प्रियंकाचे निकसोबतचे इंस्टाग्रामवरील फोटो खूप हिट ठरले. यामध्ये प्रियंका आणि निकने एकसारखेच कपडे घातले आहेत. प्रियंकाने यामध्ये सफेद रंगाच्या टॉपसोबत डेनिम शॉर्टस कॅरी केले आहेत. तर निक सफेद रंगाच्या टी-शर्टसोबत काळ्या रंगाची पॅन्ट घातली आहे.