राखी सावंत म्हणतेय, ईथे माझं घर बसत नाहीये आणि लोकं घटस्फोट घेतायेत, पहा व्हिडिओ

ड्रामा क्वीन राखी सावंत तिच्या विचित्र विधानामुळे कायम चर्चेत असेत

Updated: Jul 5, 2021, 08:40 PM IST
 राखी सावंत म्हणतेय, ईथे माझं घर बसत नाहीये आणि लोकं घटस्फोट घेतायेत, पहा व्हिडिओ

मुंबई : ड्रामा क्वीन राखी सावंत तिच्या विचित्र विधानामुळे कायम चर्चेत असेत. अलीकडेच राखीने आमिर खानच्या घटस्फोटाबद्दल एक विधान मांडलंय. या बददल तिला विचारंल असता ती म्हणाला की, त्याने माझं ऐकलं नाही म्हणून?

'माझे घरतर बलसं नाही, लोकं मात्र घटस्फोट घेत आहेत'
राखी सावंतचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये राखी आमिर खानच्या घटस्फोटावर बोलली आहे. ती म्हणाली की, मला आमिरचा घटस्फोट आवडला नाही. माझं घर तर बसलं नाही आणि लोकं दुसऱ्या बाजूला घटस्फोट घेत आहेत असं ती यावेळी म्हणाली

'आमिरने माझे शब्द पाळले'
या व्हिडिओमध्ये राखी सावंत एका मुलाखतीविषयी बोलताना दिसत आहे. राखीने सांगितलं की, बर्‍याच वर्षांपूर्वी तिने आमिर खानची मुलाखत घेतली होती. तेव्हाच आमिरने किरण रावशी लग्न केलं होतं. यावर राखी म्हणाली होती की, मला त्याने केलेलं दुसरं लग्न आवडलं नाही. त्याने माझं ऐकलेलं दिसतंय. व्हिडिओमध्ये राखी सावंत तिच्या लग्नाविषयी बोलताना म्हणाली की, माझ्यासाठी नवरा शोधा आणि घेऊन या. पुन्हा माझा स्वयंवर करा यावेळी मी निश्चितपणे लग्न करीन.