Rashmika Mandanna : अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाचा 'पुष्पा 2' चित्रपटात आज जगभरात प्रदर्शित झालाय. गेल्या अनेक दिवसांपासून चाहते या चित्रपटाची वाट पाहत होते. 'पुष्पा 2' हा चित्रपट 2024 मधील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगच्या कमाईतून मोठ्या प्रमाणात कमाई केली आहे. या चित्रपटाने रिलीजपूर्वीच अॅडव्हान्स कमाईतून अनेक हिट चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत.
दरम्यान, अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांनी 'पुष्पा 2' चित्रपटाचे प्रमोशन मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या ठिकाणी केले होते. परंतु, तुम्हाला माहिती आहे का की, पुष्पामधील श्रीवल्ली म्हणजेच अभिनेत्री रश्मिका मंदानाने 5 सुपरहिट चित्रपट करण्यास नकार दिला होता. कोणते आहेत ते चित्रपट. जाणून घेऊयात.
या 5 सुपरहिट चित्रपटांना श्रीवल्लीने दिलाय नकार
मास्टर
रश्मिका मंदानाने रिजेक्ट केलेल्या चित्रपटांमध्ये थलपति विजयचा 'मास्टर' चित्रपटाचा समावेश आहे. 'मास्टर' चित्रपटात थलपति विजयसोबत मालविका मोहनन दिसली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. मालविकाच्या आधी हा चित्रपट रश्मिका मंदानाला ऑफर करण्यात आला होता. कारण हा चित्रपट करण्यासाठी तिच्याकडे वेळ नव्हता.
जर्सी
शाहिद कपूर आणि मृणाल ठाकूर यांचा 'जर्सी' हा चित्रपट तेलुगूमध्ये बनवण्यात आला होता. त्यानंतर हाच चित्रपट हिंदीमध्ये प्रदर्शित करण्यात आला. हा चित्रपट रश्मिका मंदानाला देखील ऑफर करण्यात आला होता. परंतु, तिने तो रिजेक्ट केला.
गेम चेंजर
'गेम चेंजर' चित्रपटात राम चरण आणि कियारा आडवाणी मुख्य भूमिकेत होते. कियारा आडवाणीच्या आधी 'गेम चेंजर' हा चित्रपट रश्मिका मंदानाला ऑफर करण्यात आला होता. परंतु, तिने हा चित्रपटाला नकार दिला होता. अद्याप यामगचे कारण समोर आलेले नाहीये.
बीस्ट
थलपति विजयचा 'बीस्ट' चित्रपटाचे दिग्दर्शन नेल्सन दिलीप कुमार यांनी केले होते. या चित्रपटाची ऑफर रश्मिका मंदानाला आली होती. परंतु, तिने हा चित्रपट करण्यास देखील नकार दिला होता.
संजय लीला भंसाली
रश्मिका मंदानाच्या या लिस्टमध्ये संजय लीला भंसाली यांच्या देखील चित्रपटाचे नाव आहे. रश्मिका मंदानाला संजय लीला भंसाली यांच्यासोबत हिंदी चित्रपटात देखील काम करण्याची संधी मिळाली होती. परंतु, रश्मिका मंदानाने नकार दिल्याने चित्रपट बनवला नाही.