Ved Box Office Collection : 'वेड' चित्रपटानं प्रेक्षकांना लावलं वेड! रितेश- जिनिलियाच्या सिनेमानं मोडला आणखी एक विक्रम

Ved चित्रपटानं लावलं प्रेक्षकांना वेड... रितेश- जिनिलियाच्या चित्रपटानं नागराज मंजुळेच्या 'सैराट' चित्रपटाला मागे टाकलं आहे. 

Updated: Jan 15, 2023, 04:03 PM IST
Ved Box Office Collection : 'वेड' चित्रपटानं प्रेक्षकांना लावलं वेड! रितेश- जिनिलियाच्या सिनेमानं मोडला आणखी एक विक्रम title=

VED Box Office Collection Day 16 : बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) यांचा नुकताच 'वेड' (Ved) हा चित्रपट प्रदर्शित झाला. खासगी आयुष्यात सगळ्यांची चाहती असणाऱ्या या जोडीनं मोठ्या पडद्यावरही जादू केली आहे. या चित्रपटानं प्रेक्षकांना खरंच वेड लावलं आहे. रितेश आणि जिनिलियाच्या 'वेड' चित्रपटानं प्रदर्शनाच्या इतक्या दिवसांनंतरही त्याचे प्रेक्षकांना वेड लावले आहे. रितेश आणि जिनिलियाच्या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनं सगळ्यात लोकप्रिय ठरलेल्या 'सैराट' चित्रपटालाही मागे टाकत एक नवीन विक्रम केला आहे.

वेडनं सर्वाधिक कमाई करण्याचा सैराट चा रेकॉर्ड कधीच मोडला आहे. प्रदर्शनाच्या दुसऱ्या रविवारी 'वेड'ने 5.70 कोटींची कमाई केली. तर सैराटनं 4.61 कोटींची कमाई केली होती. वेड चित्रपट एकामागे एक रेकॉर्ड मोडताना दिसत आहे. तर आता वेड आणखी एक रेकॉर्ड मोडण्याच्या मार्गावर आहे. वेड आता सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत दुसरं स्थान पटकावलं आहे. याची माहिती चित्रपट समिक्षक तरण आदर्शनं ट्विटरवर पोस्ट शेअर करत खुलासा केला आहे. तर सैराट हा चित्रपट पहिल्या स्थानीच आहे. 

पहिल्या आठवड्यात वेडने 10 कोटींची कमाई केली. तर दुसऱ्या आठवड्यात चित्रपटानं 12.75 गल्ला केला. तर शुक्रवारी चित्रपटानं 1.35 कोटींची कमाई केली, तर शनिवार 16 व्या दिवशी चित्रपटानं 2.72 ची कमाई केली. आज रविवार असल्यामुळे वेड हा चित्रपट चांगली कमाई करेल असा अंदाज असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, चित्रपटानं एकूण 44.92 कोटींच्या गल्ला केला. त्यामुळे आता हा चित्रपट लवकरच 50 कोटींच्या क्लबमध्ये जाणार अशी अपेक्षा त्यांच्या चाहत्यांना आहे. 

हेही वाचा : Malaika Arora चा 'हा' नवा लूक सोशल मीडियावर होतोय व्हायरल

या चित्रपटाचे दिग्दर्शन रितेश देशमुखनं (Riteish Deshmukh) केलं आहे. या चित्रपटातून जिनिलियानं मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. या पूर्वी जिनिलीयानं हिंदी, तेलगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम अशा 5 भाषिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 'वेड' या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, विद्याधर जोशी तसेच अभिनेता शुभंकर तावडे आणि अभिनेत्री जिया शंकर अनेक कलाकार आहेत. संगीतकार अजय अतुल यांनी वेड चित्रपटातील गाणी संगीतबद्ध केली आहेत. गाणी अजय-अतुल, गुरु ठाकूर यांनी लिहिली आहेत. तर जिनिलिया या चित्रपटाची निर्माती आहे