सलमान खानने 2011 रुपयाची परतफेड करण्यासाठी मुलाला केलं लाँच

सलमान खान नवीन कलाकारांना लाँच करण्यात अग्रेसर असतो हे आपल्याला माहितच आहे. सलमान खानने 30 मे रोजी एक फोटो पोस्ट केला होती आणि उद्या मी एका कलाकाराला लाँच करत असल्याचं सांगितलं. आज सलमान खानने जहीर इकबालला लाँच केले आहे. सलमान खानने जहीरला लाँच तर केलंच पण त्याबरोबर एक सल्ला देखील दिला.

सलमान खानने 2011 रुपयाची परतफेड करण्यासाठी मुलाला केलं लाँच  title=

मुंबई : सलमान खान नवीन कलाकारांना लाँच करण्यात अग्रेसर असतो हे आपल्याला माहितच आहे. सलमान खानने 30 मे रोजी एक फोटो पोस्ट केला होती आणि उद्या मी एका कलाकाराला लाँच करत असल्याचं सांगितलं. आज सलमान खानने जहीर इकबालला लाँच केले आहे. सलमान खानने जहीरला लाँच तर केलंच पण त्याबरोबर एक सल्ला देखील दिला.

सलमान म्हणाला की, ज्याच्यावर तू प्रेम करतोस आणि जो तुझ्यावर प्रेम करतो त्यांचा नेहमीच सन्मान कर. त्याचबरोबर त्यांच्याप्रती नेहमीच प्रामाणिक राहा. सलमानने बुधवारी आपल्या चाहत्यांसाठी एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये एक मुलगा त्याच्या कडेवर बसलेला दिसत आहे. उपलब्ध माहितीनुसार, जहीरला कुठल्याही प्रकारची चित्रपट पार्श्वभूमी नाही. फक्त त्याचे वडील सलमानचे लहानपणीचे मित्र आहेत.

आता सलमान त्याला काश्मीरमधील लव्ह स्टोरीवर आधारित बनत असलेल्या सिनेमातून लॉन्च करणार आहे. तसेच सलमान खान म्हणाला की, किशोरावस्थामध्ये हा मुलगा माझी बँक होता. मला अजूनही यांचे 2011 रुपये द्यायचे आहेत. मी देवाचा आभारी आहे की, मला याचे व्याज द्यावे लागले नाही.