60 सुरक्षारक्षक, आधार कार्ड सक्ती अन्...; बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सलमान खानचा मोठा निर्णय

Salman Khan Starts Shooting: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांच्या हत्येनंतर सलमान खानला (Salman Khan) जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून, यादरम्यान त्याने शुटिंगला सुरुवात केली आहे. शुक्रवारच्या 'विकेंड का वार'चं (Weekend Ka Vaar) शुटिंग तो करत आहे.   

शिवराज यादव | Updated: Oct 18, 2024, 04:18 PM IST
60 सुरक्षारक्षक, आधार कार्ड सक्ती अन्...; बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सलमान खानचा मोठा निर्णय title=

Salman Khan Starts Shooting: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांच्या हत्येनंतर सलमान खानला (Salman Khan) जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. जीवाला धोका असल्याने सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. यादरम्यान सलमान खान पुन्हा एकदा शुटिंगसाठी परतला आहे. सलमान खान गुरुवारी रात्री उशिरा बिग बॉसच्या सेटवर पोहोचला. यावेळी त्याच्यासोबत सुरक्षारक्षकांचा फौजफाटा होता. आपली नियोजित जागा सोडून सलमान इतर कुठेही वावरत नव्हता. 

बिग बॉसचं शुटिंग आधी ठरल्याप्रमाणे केलं जात असून, सलमान खनची टीम प्रोडक्शन आणि चॅनेलशी समन्वय साधत आहे. यावेळी सुरक्षा व्यवस्थेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही याची खात्री केली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अभिनेता सेटवर 60 हून अधिक सुरक्षा कर्मचाऱ्यांसह शूटिंग करणार आहे. परिसराच्या सुरक्षेसाठी कठोर उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. आधार कार्ड पडताळणीशिवाय बाहेरील कोणत्याही व्यक्तीला कंपाऊंडमध्ये प्रवेश करण्याची परवानगी नाही.

Baba Siddiqui Murder: वडिलांच्या हत्येनंतर झिशान सिद्दिकींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'गरीब, निष्पाप...'

दुसरीकडे बिग बॉस 18 च्या क्रू मेम्बर्सला शूट संपेपर्यंत तिथेच थांबण्यास सांगण्यात आलं आहे. यादरम्यान 'विकेंड का वार'चे एपिसोड शूट केले जाणार आहेत. 

दरम्यान, लॉरेन्स बिष्णोई टोळीतील एका कथित सदस्याने मुंबई वाहतूक पोलिसांना धमकीचा संदेश पाठवून दीर्घकाळ चाललेला वाद सोडवण्यासाठी सलमानकडे 5 कोटी रुपयांची मागणी केली आहे. जर सलमानने पैसे देण्यास अयशस्वी झाल्यास त्याचे नशीब माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्यापेक्षा वाईट असेल असा इशाराही या संदेशात देण्यात आला आहे.

'मला गोळी लागलीये, मी...', मृत्यूआधी बाबा सिद्दिकी यांचे शेवटचे शब्द काय होते? प्रत्यक्षदर्शींनी केला खुलासा

सलमान खानने बिग बॉसच्या शेवटच्या वीकेंड एपिसोडचे शुक्रवारी 11 ऑक्टोबर रोजी शूटिंग केल्यानंतर बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्यात आली. बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर, सलमान खानला वाय-प्लस सुरक्षा देण्यात आली आहे आणि आता पोलिस एस्कॉर्ट वाहन त्याच्या वाहनासोबत प्रवास करत आहे. त्याच्यासह सर्व शस्त्रं चालवू शकणारे कॉन्स्टेबलही आहेत. 

सलमानच्या घरी नेमकी काय स्थिती?

'झूम'ला दिलेल्या मुलाखतीत अरबाज खानने कुटुंब सध्या चिंतेत असल्याचं सांगितलं आहे. तसंच सलमान खान आपले चित्रपट पूर्ण करण्यास कटिबद्ध असल्याचंही सांगितलं. तो म्हणाला की "आम्ही सध्या ठीक आहोत. मी असं म्हणणार नाही की आम्ही एकदम बरे आहोत, कारण कुटुंबात बरंच काही घडत आहे. नक्कीच प्रत्येकजण चिंतेत आहे. मी माझा चित्रपट बंदा सिंग चौधरीचं प्रमोशन करण्यास कटिबद्ध आहे. 25 ऑक्टोबरला माझा हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट वेळेत रिलीज होईल याची मी काळजी घेत आहे. अनेक गोष्टी घडत असताना मला जे करणं भाग आहे ते करावं लागेल".

सलमान खानच्या सुरक्षेबाबात बोलताना  त्याने संपूर्ण कुटुंब त्याच्या सुरक्षेसाठी मेहनत घेत असल्याची माहिती दिली. "आम्ही अतिशय व्यवस्थित आहोत असं मी म्हणणार नाही. पण जे सर्वोत्तम आहे ते करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही खात्री करुन घेत आहोत की, सरकार आणि पोलिसांसह प्रत्येकजण गोष्टी ज्याप्रकारे ठरल्या आहेत तशाच व्हाव्यात आणि सलमानची सुरक्षा व्हावी. प्रत्येकजण आपलं सर्वोत्तम देत आहे. आम्ही गोष्टी अशाच प्रकारे राहतीत हे पाहत आहोत," अशी माहिती अरबाज खानने दिली आहे.