१४ वर्षांत सलमान खानच्या घरगुती गणेशोत्सवाची ही प्रथा खंडीत होणार !

 सलमान खान आणि त्यांच  कुटुंबीय दरवर्षी दीड दिवसांचा गणेशोत्सव साजरा करतात.

Updated: Aug 18, 2017, 02:10 PM IST
१४ वर्षांत सलमान खानच्या घरगुती गणेशोत्सवाची ही प्रथा खंडीत होणार !  title=

मुंबई :  सलमान खान आणि त्यांच  कुटुंबीय दरवर्षी दीड दिवसांचा गणेशोत्सव साजरा करतात.

पण यंदा १४ वर्षांमध्ये पहिल्यांदाच वांद्रे येथील गॅलॅक्सी अपार्टमेंटऐवजी खान कुटुंबीय त्यांच्या घरातील शेंडेफळ म्हणजेच अर्पिता खान शर्मा हीच्या घरी गणेशोत्सवामध्ये सहभागी होणार आहेत.  



गेल्यावर्षीही सलमान खान 'ट्युबलाईट' चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त असल्याने मुंबईत गणेशोत्सवात सहभागी होऊ शकला नव्हता. पण यंदा 'टायगर जिंदा है' या चित्रपटासाठीचे अबुधाबीमध्ये सुरू असलेले चित्रकरण आटपून सलमान २५ ऑगस्टला मुंबईत परतणार आहे. सलमान केवळ एकच दिवस मुंबईत असेल त्यानंतर पुन्हा तो चित्रीकरणासाठी परतणार आहे. 



'टायगर जिंदा है' चित्रपटानंतर सलमान खान कडे अजून २-३ चित्रपट आहेत. त्यापैकी रेस ३ चं चित्रीकरण सुरू केले जाईल असे काही मिडीया रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. मात्र रेमो डिसुझा दिग्दर्शित एका डान्स फिल्ममध्ये सलमान प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटामध्ये सलमान १३ वर्षीय मुलाच्या वडीलांची भूमिका साकारत आहे. सोबतच तो डान्सरची भूमिका बजावत आहे. त्यासाठी सलमान खान हिप हॉप हा डान्स प्रकार शिकत आहेत.