Sidharth Kiara Wedding : कियारा-सिद्धार्थच्या लग्नाच्या तयारीचा Video LEAK, जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसमध्ये वाजणार सनाई

Sidharth Malhotra - Kiara Advani Wedding : चाहते ज्या क्षणाची वाट पाहत होते तो क्षण आला आहे. शेरशाह जोडी या तारखेला सात फेरे घेणार आहेत. कियारा सिद्धार्थच्या लग्नाच्या तयारीचा पहिला व्हिडीओ लीक झाला आहे. 

Updated: Feb 3, 2023, 09:03 AM IST
Sidharth Kiara Wedding : कियारा-सिद्धार्थच्या लग्नाच्या तयारीचा Video LEAK, जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसमध्ये वाजणार सनाई title=
sidharth malhotra kiara advani wedding 6 February guest list rajastahn jaisalmer suryagarh hotel everything you all need to know first video leaked

Sidharth Malhotra - Kiara Advani Wedding : बी टाऊनमधील सर्वात प्रसिद्ध जोडी शेरशाह जोडी कियारा ( Kiara advani) आणि सिद्धार्थाच्या (Sidharth Malhotra) लग्नाची तयारी जोरदार सुरु झाली आहे. हे वर्ष सेलिब्रिटींच्या लग्नांनी सुरु झालं आहे. केएल राहुल आणि अथिया शेट्टीनंतर (KL Rahul Athiya-Shetty Wedding) आता बॉलिवूड ही जोडी शाही लग्न करणार आहे. हे शाही लग्न राजस्थानमधील जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसमध्ये (Suryagarh Palace in Jaisalmer) होणार आहे. 6 फेब्रुवारीला हे दोघे विवाहबंधनात अडकणार आहे. त्यापूर्वी 4 फेब्रुवारीपासून प्री वेडिंग सेलिब्रेशन सुरु होणार आहे. या शाही लग्नाच्या तयारीचा व्हिडीओ (Sidharth Kiara Wedding Video) लीक झाला आहे.  

बँड बाजा वरात!

सूर्यगढ पॅलेस (Suryagarh Hotel) हे जैसलमेमधील सर्वात आलिशान आणि रॉयल पॅलेस आहे. याच ठिकाणी राजेशाही थाटात कियारा आणि सिद्धार्थ विवाह करणार आहेत. या लग्नातील पाहुण्यांसाठी लक्झरी व्हिला बुक करण्यात आळा आहे. या व्हिलामध्ये 80 खोल्या आहेत. इतकंच नाही तर या जोडप्याच्या लग्नात कडेकोट सुरक्षा व्यवस्था देखील ठेवण्यात आली आहे. या पॅलेसमध्ये लग्नाचा खर्च तुम्ही ऐकाल तर अवाक् व्हाल. जवळपास 1 ते 2 कोटी रुपयांच्या घरात याचं भाडे आहे. तर पाहुण्यांना नेण्यासाठी मर्सिडीज बेंझ, जग्वार आणि बीएमडब्ल्यूसह सुमारे 70 कारची व्यवस्था करण्यात आली आहे. या राजवाड्याचा पहिला व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये तुम्हाला ढोल-ताशांचा आवाज ऐकू येईल. (sidharth malhotra kiara advani wedding 6 February guest list rajastahn jaisalmer suryagarh hotel everything you all need to know first video leaked)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Voompla (@voompla)

मीडिया रिपोर्ट्सनुसार 4 फेब्रुवारीला मेहंदी आणि हळद असणार आहे. तर  संगीत सोहळा 5 फेब्रुवारीला होणार आहे. 6 तारखेला सोमवारी शाही लग्नानंतर हे Newly Married Couple मुंबईत 7 फेब्रुवारीला ग्रॅण्ड रिसेप्शन देणार आहेत. या रिसेप्शनला बॉलिवूडचे अनेक स्टार्स उपस्थित राहणार आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Voompla (@voompla)

कोणा कोणाला लग्नाचं निमंत्रण? 

या सोहळ्यासाठी  फक्त 100-125 पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. या लग्नाची गेस्ट लिस्टमध्ये बॉलिवूडपासून इतर क्षेत्रातील अनेक सेलिब्रिटींना आमंत्रित देण्यात आलं आहे. मेगास्टार अमिताभ बच्चनपासून शाहरुख खान, करण जोहर, वरुण धवन आणि ईशा अंबानीपर्यंत अनेक सेलिब्रिटींच्या नावांचा समावेश आहे. शाहिद कपूर आणि मीरा राजपूत देखील लग्नाला उपस्थित राहणार आहेत कारण कियारा आणि शाहिद खूप जवळचे मित्र आहेत. यासोबत कियारा-सिद्धार्थ त्यांच्या बालपणीच्या मित्रांनाही या लग्नात आमंत्रित करणार आहेत.

असं असेल वधूचं रुप!

कियारा लग्नात मनीष मल्होत्राचा डिझायनर लाल रंगाचा लेहेंगा तर सिद्धार्थ पांढऱ्या रंगाची शेरवानी घालणार असल्याचं सांगितलं जातं आहे. या लग्नात इटालियन आणि भारतीय स्वादिष्ट जेवणासोबतच राजस्थानचे खास पदार्थही पाहुण्यांना देण्यात येणार आहेत.