विकी - कतरिनाच्या लग्नात बॉलिवूडचं नवं कपल देणार कबुली, ''आमचंही जमलंय''

विकी - कतरिनाचं लग्न आणि त्यात बॉलिवूडची ही नवी जोडी देणार प्रेमाची कबुली  

Updated: Nov 19, 2021, 03:51 PM IST
विकी - कतरिनाच्या लग्नात बॉलिवूडचं नवं कपल देणार कबुली, ''आमचंही जमलंय'' title=

मुंबई : अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफच्या लग्नाच्या चर्चा वाऱ्यासारख्या पसरत आहे. 7 ते 9 डिसेंबर दरम्यान दोघांचं लग्न होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. लग्नासाठी सवाई माधोपूर (राजस्थान) येथील सिक्स सेन्स फोर्टची निवड करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून लग्नाशी संबंधित अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. यामध्ये लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांच्या यादीपासून ते लग्नात मिळणाऱ्या मिठाईच्या यादीचा समावेश आहे. 

आता असं कळत की विकी आणि कॅटच्या लग्नात योग्य संधी पाहून आणखी एक बॉलिवूड कपल त्यांच्या नात्याची घोषणा करणार आहे. ही जोडी दुसरी कोणी नसून 'शेरशाह' चित्रपटातील सिद्धार्थ मल्होत्रा ​आणि कियारा अडवाणी ही हिट जोडी आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

कतरिना आणि विकीच्या लग्नात 'शेरशाह' चित्रपटाच्या गाण्यावर दोघांची जोडी रोमँटिक ड्युएट परफॉर्मन्स देणार असल्याचं समोर येत आहे. सोबतचं अशा बातम्या येत आहेत की या लग्नात योग्य संधी पाहून दोघेही नात्याची कबुली देणार आहेत. विकी आणि कॅटच्या लग्नात अनेक जोडपी परफॉर्मन्स देतील आणि सिड-कियारा ही जोडी देखील त्यापैकी एक आहे.

सिद्धार्थ आणि कियारा गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघांनी सात जन्म एकत्र राहण्याची शपथ घेतली आहे. दोघांची जोडी नुकतीच 'शेरशाह'  हिट चित्रपटात दिसली. त्यांच्या केमिस्ट्रीने लोकांची मने जिंकली. दोघांच्या ऑफ स्क्रिन केमिस्ट्रीची जादू पडद्यावरही दिसून आली.