Vicky Kaushal आणि Katrina मध्ये बिनसलं? पतीला 'या' अभिनेत्रीसोबत बाथटबमध्ये पाहून कॅट नाराज

Vicky Kaushal नं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केल्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्यात बिनसल्याची चर्चा सुरु झाली आहे. दुसरीकडे नुकताच 'गोविंदा नाम मेरा' चा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. 

Updated: Nov 29, 2022, 07:15 PM IST
Vicky Kaushal आणि Katrina मध्ये बिनसलं? पतीला 'या' अभिनेत्रीसोबत बाथटबमध्ये पाहून कॅट नाराज title=

Vicky Kaushal and Katrina Kaif : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. विकी आणि कतरिना (Katrina Kaif) यांची जोडी तर कपल गोल असल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, विकी सध्या त्याच्या 'गोविंदा नाम मेरा' (Govinda Naam Mera) या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात  अभिनेत्री कियारा अडवाणीसोबत (Kiara Advani) दिलेल्या बाथटबमधील बोल्ड सीन्स (Bathtub Scene) पाहून कतरिना आणि त्याच्यात काही बिनसलं असेल अशा चर्चा नेटकऱ्यांमध्ये सुरु झाल्या आहेत. 

नुकताच चित्रपटाच्या रोमँटिक गाण्याचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. चित्रपटात आणि गाण्यात विकी आणि कियाराला बाथटबमध्ये रोमॅंटिक अंदाजात पाहून कतरिनाच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. नेटकऱ्यांनी विकीला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. विकीनं हा टीझर त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे.विकीनं शेअर केलेल्या या टीझरमध्ये कियारानं काळ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. तर विकीनं काळ्या रंगाचा शर्ट आणि पॅंट परिधान केली आहे. त्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत त्याला चिडवायला सुरुवात केली आहे. तर काही नेटकऱ्यांनी त्या दोघांची केमिस्ट्रीचे कौतूकही केले आहे. गाण्यात एकच ओळ ऐकू येते आणि ती म्हणजे 'जो तूने पिलाई हुआ शराबी'. आता संपूर्ण गाण कधी ऐकायला मिळेल याची प्रतिक्षा नेटकरी करत आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पाहा काय म्हणाले नेटकरी -

दरम्यान, विकीला ट्रोल करत नेटकऱ्यांनी कमेंट केल्या की 'तुला लाज नाही वाटत की इतकी सुंदर पत्नी आहे तरी सुद्धा दुसऱ्या स्त्रीसोबत रोमान्स करतोस.' दुसरा नेटकरी म्हणाला की, 'विकीला स्क्रिनवर असा रोमान्स करताना पाहून कतरिना नक्कीच जळत असेल.' तिसरा म्हणाला, 'या गाण्यामुळे विकी आणि कतरिनामध्ये फूट येण्याची शक्यता आहे.' आणखी एक नेटकरी म्हणाला की, 'आता कतरिना आणि विकीला पुढच्या गाण्यात रोमॅंटिक अंदाजात बघायचं आहे.' (vicky kaushal to romance with kiara advani trolls says katrina is jealous of it govinda naam mera) 

गोविंदा नाम मेरा चित्रपटातील हे गाणं शराबी जुबिन नॉटियाल यांनी गायलं आहे, तर तनिष्क बागचीनं यांनी या गाण्याला संगीत दिलं आहे. पूर्ण गाणं उद्या म्हणजे 30 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, 'गोविंदा नाम मेरा'  चित्रपट 16 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी हा चित्रपट 10 जून 2022 रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु काही कारणांमुळे तो प्रदर्शित होऊ शकला नाही. आता 'गोविंदा नाम मेरा' रिलीजसाठी सज्ज झाला आहे. 

हेही वाचा : Amitabh Bachchan यांच्यामुळे रेखा अडचणीत? 'हा' हट्ट करणं पडलं महागात

धर्मा प्रोडक्शनची निर्मिती असलेला हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, विकीची डान्सरची भूमिका आहे. चित्रपटात विकीची पत्नीशिवाय एक मैत्रीणही असणार आहे. चित्रपटात विकी घर मिळवण्यासाठी सतत धडपड करताना दिसतोय. चित्रपटाच्या नावावरून हा अभिनेता गोविंदाची बायोपिक (Govinda's Biopic) आहे असे अनेकांना वाटतं. करण जोहरनं (Karan Johar) नुकताच एक व्हिडीओ शेअर करत ही गोविंदावर (Govinda) असलेली बायोपिक नसून एका डान्सरनं केलेल्या स्ट्रगलची आहे. दरम्यान, विकीसोबत भूमि पेडणेकरनं (Bhumi Pednekar) 'भूत पार्ट वन: द हॉन्टेड शिप' मध्ये काम केलं आहे. कियारासोबत विकीनं 'लस्ट स्टोरीज' मध्ये काम केलं आहे.