'आम्हाला असं वाटलं लग्न करतोय...' जेव्हा प्रियांका चोप्रा पहिल्यांदा प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला किस करणार तेवढ्यात...

Priyanka Chopra First Love: निक जोनससोबत लग्न करण्यापूर्वी प्रियांका चोप्राच पहिलं प्रेमाबद्दल तुम्हाला माहितीय का? घरी कोणी नसताना बॉयफ्रेंडला बोलवलं अन् मग...

नेहा चौधरी | Updated: Jul 18, 2024, 05:28 PM IST
'आम्हाला असं वाटलं लग्न करतोय...' जेव्हा प्रियांका चोप्रा पहिल्यांदा प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला किस करणार तेवढ्यात... title=
We thought we were getting married Priyanka Chopra fell in love for the first time class-10th she was about to kiss her boyfriend

Priyanka Chopra First Love : बॉलिवूडची देसी गर्ल अभिनेत्री प्रियांका चोप्राआज ग्लोबल स्टार असून आज तिचा वाढदिवस आहे. अवघ्या 18 व्या वर्षी मिस वर्ल्डचा किताब जिंकल्यानंतर रंग भेदापासून अनेक गोष्टींचा सामना तिला करावा लागला. निक जोनससोबत लग्न झाल असून तिला एक मुलगी आहे. पण लग्नापूर्वी तिच बड्या स्टार्ससोबत नाव जोडल्या गेले होतं. अक्षय कुमार, शाहरुख खानसोबत तिच्या अफेयरच्या चर्चा रंगल्या होत्या. पण तुम्हाला प्रियांकाचे पहिलं प्रेमाबद्दल माहितीय का?

'आम्हाला असं वाटलं लग्न करतोय...'

खरं तर, ती दहावीत असताना पहिल्यांदाच प्रेमात पडला होता. याबद्दल अभिनेत्रीने स्वतः किस्सा शेअर केलाय. प्रियांकाने लिहिलेल्या 'अनफिनिश्ड' पुस्तकात हा किस्सा सांगितला आहे. ती 10वीत शिकत असताना पहिल्यांदा तिच्या बॉयफ्रेंड बॉबला भेटली होती. दोघेही नॉर्थ सेंट्रल हायस्कूलमध्ये एकत्र शिकत होते. बॉब तिच्या वर्गाबाहेर उभा राहायचा आणि वर्ग संपेपर्यंत प्रियांकाला हसवत असायचा. अभिनेत्री त्याच्यासोबत अधिकाधिक वेळ घालवत होती. हात धरून चालणे असो किंवा तासनतास गप्पा असो. एका दिवशी अभिनेत्रीला वाटलं की तिचं खरंच लग्न होतंय. ते झालं असं की, बॉबने त्याच्या गळ्यातील सोन्याची जाड साखळी काढली आणि ती अभिनेत्रीच्या गळ्यात घातली. त्या क्षणी प्रियांकाला वाटलं की तिचं लग्न होत आहे.

प्रियांका चोप्रा त्यावेळी मावशीच्या घरी राहत होती. तिच्या घरी डेटिंगसारख्या गोष्टींना परवानगी नव्हती. प्रियांकाने सांगितलं की, ती तिच्या मावशीसमोर ओव्हरस्मार्ट होण्याचा प्रयत्न करत होती पण तिची किरण मावशी तिच्यापेक्षा जास्त हुशार होती. बॉबशी बोलण्यासाठी प्रियांकाने एक शक्कल लढवली होती. बॉब आपल्या बहिणीला तिच्या घरी फोन करायला लावायचा जेणेकरून मावशीला वाटेल की प्रियांकाला मैत्रिणीशी बोलतेय. पण मावशी जास्त हुशार ना, एक दिवस किरण मावशीने दुसऱ्या लँडलाइनवर ती बोलत असताना फोन उचलला आणि त्यांचं बोलणं ऐकलं. यानंतर फोन कॉल्स देखील बंद झाले. 

त्यानंतर प्रियांकाने अजून एक युक्ती केली. सेक्स एज्युकेशनच्या एक्स्ट्रा क्लासच्या बहाण्याने ती बॉबसोबत घरी यायची आणि बाहेर बस स्टॉपवर उतरायची जेणेकरून मावशीला वाटेल की ती बसने आलीय. मग एक दिवशी हा प्रकार उघडकीस आला जेव्हा अभिनेत्रीची मावशी किरण शाळेतून तिचा पाठलाग करत होती आणि तिला तिच्या प्रियकरासह पकडलं होतं. तर पुढे काय मग तर एक दिवशी मावशी घरी नाही पाहून प्रियांकाने बॉबला घरी बोलावलं. तो आला आणि ते दोघे पहिलं किस करणार तेवढ्यात मावशी आली. प्रियांकाने बॉबला कपाटात लपवले. मावशीला शंका आली आणि तिने घराची झाडाझडती घेतली अखेर कपाट उघडताच तिथे तिला बॉब दिसला. 

यानंतर प्रियांकाच्या मावशी तिच्या आईला फोन करून संपूर्ण परिस्थिती सांगितली. त्यानंतर तिचे आई वडील तिथे आले आणि अभिनेत्रीला मायदेशी म्हणजेच भारतात घेऊन आला. येथे आल्यानंतर तिने तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित केलं.