मुंबई : आजकालच्या धकाधकीच्या आणि गुंतागुतीच्या जीवनशैलीचा परिणाम नक्कीच आरोग्यावर होतो. त्याचबरोबर प्रदूषण, अपूरी झोप, अवेळी खाणे, ताण या सगळ्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य धोक्यात येते. आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली असून कमी वयातच अनेक आजारांचा, व्याधींचा सामना करावा लागत आहे. पण काही चांगल्या सवयींनी आपण यावर मात करू शकतो. जाणून घेऊया या सवयींविषयी...
जीवनात आपण नेहमीच आनंदी राहू शकत नाही. अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणावरून आपण दुःखी असतो, त्रासलेले असतो. याच वेळेस मनात नकारात्मक विचार येऊ लागतात. मात्र त्यावेळेस असा विचार करणे योग्य नाही. कारण आपल्या मनाची शक्ती अपरंपार आहे. म्हणून नेहमी सकारात्मक विचार करा. तशी सवयच लावून घ्या. त्यामुळे तुमचा ताण-तणावही कमी होईल.
रोज कमीत कमी ८ ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे. रिपोर्टनुसार, शरीराच्या वजनाच्या प्रत्येक किलोमागे एक लीटर पाणी प्यायला हवे. म्हणजेच जर तुमचे वजन ६० किेलो असेल तर ३ लीटर पाणी पिणे आवश्यक आहे.
सर्दी खोकला झाल्यावर गरम पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. मात्र त्याव्यतिरिक्तही नेहमी किंवा सकाळी उठल्यावर गरम पाणी प्यायल्यास खूप फायदा होईल.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास व्हिटॉमिन सी फायदेशीर ठरते. दररोज ६०-९० एमजी या प्रमाणात व्हिटॉमिन सी घेणे आवश्यक असते. म्हणून आहारात व्हिटॉमिन सी युक्त पदार्थांचा अवश्य समावेश करा.
सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत आवश्यक तितकी झोप मिळत नाही. याचा आरोग्यावर नक्कीच परिणाम होतो. म्हणून शांत आणि पुरेशी झोप घेणे गरजेचे आहे. त्यामुळे आजार दूर राहतात.