नवी दिल्ली : वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर भरपूर पाणी पिणे तुमच्या पथ्यावर पडेल. पाणी पिण्याचे फायदे तर अनेक संशोधनातून समोर आले आहेत. भरपूर पाणी प्यायल्याने फक्त वजनच कमी होणार नाही तर त्वचेला तजेलाही येईल.
Dietary flavonoid intake and weight maintenance च्या अभ्यासानुसार जे लोक पेय पदार्थांचे अधिक सेवन करतात, त्यांचे वजन वाढण्याची संभावना कमी असते. इंटरनेशनल जर्नल मोलिकुलर मेडिसिन अॅण्ड अॅडव्हांस सायन्सनुसार व्हिटॉमिन सी युक्त पदार्थांमुळे पचनक्रिया सुधारते. 2008 मध्ये झालेल्या अभ्यासानुसार, ज्या महिलांचे वजन अधिक असते त्यांना पाणी प्यायल्याने वजन कमी करण्यास मदत होते.
दररोज कमीत कमी 10 ग्लास पाणी प्यायला हवे. डॉक्टर्सही असाच सल्ला देतात. रोज भरपूर पाणी प्यायल्याने त्वचेच्या समस्या दूर होतात. सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिणे फायदेशीर मानले जाते.
वजन कमी करणे ही सोपी गोष्ट नाही. सातत्याने प्रयत्न करणे अनिर्वाय आहे. कमी वेळात परिणाम दिसेल, अशी अपेक्षा न करता प्रयत्न करत रहा. यासाठी इच्छाशक्ती असणे गरजेचे आहे.
शरीराला ऊर्जा मिळते. तुम्ही अधिक काम करू शकता. फॅट्स कमी करण्यास मदत होते. मेटाबॉलिझम सुधारते. शरीरातील विषद्रव्ये बाहेर पडतात, त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.