मुंबई : प्रामुख्याने उन्हाळात मिळाणारे लीची हे लहानसे फळ चविष्ट असते. त्याचबरोबर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर ठरते. यात कार्बोहाईड्रेट, व्हिटॉमिन ए, व्हिटॉमिन सी, बी कॉम्प्लेक्स, पोटॅशियम, कल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फॉरस, आयर्न आणि मिनरल्स यांसारखे पोषकघटक असल्याने शरीर स्वस्थ राहण्यास मदत होते. मात्र याचे अतिरिक्त सेवन करणे टाळा. पाहुया लीची खाण्याचे काय आहेत फायदे...
#1. लिचीत बीटा कॅरोटीन आणि ओलीग्रोनोल असते. त्यामुळे हृदयाचे आरोग्य राखले जाण्यास मदत होते. हृदयासंबंधित समस्या असलेल्यानांनी आहारात लिचीचा समावेश अवश्य करावा.
#2. लिची पोटासंबंधित तक्रारी दूर करण्यास फायदेशीर ठरते. त्याचबरोबर इम्यूनिटी सिस्टम सुधारण्यासाठी मदत होते. तसंच बद्धकोष्ठतेची समस्येवर आराम मिळतो.
#3. वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी लिचीचा आहारात जरुर समावेश करा. सकाळच्या वेळेस लिची खाल्याने पोट भरल्यासारखे वाटते आणि भूक कमी लागते.
#4. लिचीमुळे शरीराला थंडावा मिळतो. त्याचबरोबर उन्हाळात आपल्या शरीरात निर्माण होणारी पाण्याची कमतरता भरून काढण्यास मदत होते.
#5. लिचीमुळे कन्सर पेशी वाढण्यास आळा बसतो. एका संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की, लिचीत कन्सरविरोधी लढण्याचे गुणधर्म असतात.