Weight Loss Tips: रात्री झोपण्यापूर्वी हे काम रोज करा, Malaika Arora प्रमाणे परफेक्ट फिगर

Weight Loss : वजन कमी करण्याच्या काही टीप्स अमलात आणल्यास नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होईल. रात्री झोपण्यापूर्वी हे काम रोज करा, मलायका अरोरासारखी परफेक्ट फिगर होईल. अधिक जाणून घ्या.

Updated: Nov 30, 2022, 12:16 PM IST
Weight Loss Tips: रात्री झोपण्यापूर्वी हे काम रोज करा, Malaika Arora प्रमाणे परफेक्ट फिगर title=

Weight Loss Diet: आज प्रत्येकाला वाढत्या वजनाची काळजी असते. लठ्ठपणाची अनेकजण शिकार होत आहेत. (Health Care Tips) जंकफूड याला अधिक हातभार लावतो. ( Health News in Marathi ) आजकाल प्रत्येक दुसरा व्यक्ती लठ्ठपणाचा शिकार होत आहे. मात्र, रात्री झोपण्यापूर्वी काही गोष्टी केल्या तर मलायका अरोरा (Malaika Arora) प्रमाणे फिगर करु शकता.

 झपाट्याने वजन कसे कमी करायचे असा प्रत्येकाला प्रश्न असतो. (How To Lose Weight Fast) आजकाल अनेक व्यक्ती लठ्ठपणाचा बळी ठरला आहे. धावपळीच्या युगात आपली जीवनशैली बदलेली आहे. त्यामुळे अन्न वेळेवर न घेणे हे त्यामागचे कारण आहे. त्याचवेळी, लोक वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करतात. पण तरीही यश मिळत नाही. अशा परिस्थितीत तुमची निराशा होते. पण वजन कमी न झाल्यास निराश होण्याची गरज नाही. कारण एक सोपा उपाय तुम्हाला आम्ही सांगत आहोत. रात्री झोपतानाही आपले शरीर कॅलरीज बर्न करते. अशा स्थितीत रात्री झोपण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेऊन तुम्ही मलायका अरोरासारखी (Malaika Arora) फिगर मिळवू शकता. तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी रोज कोणत्या गोष्टी कराव्यात, ते जाणून घ्या. (अधिक वाचा - Radish Benefits: थंडीत मुळा का खावा? त्याचे आहेत खूप सारे फायदे )

फिट राहण्यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी करा हे काम -

संध्याकाळी 7 नंतर जेवण करा

तुम्हाला आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची असेल आणि जाड व्हायचे नसेल तर जेवणाच्या वेळापत्रकात बदल करण्याची गरज आहे. तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असेल. त्यामुळे तुम्ही तुमच्या खाण्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. यासाठी संध्याकाळी 7 नंतर जेवण करु नये. कारण रात्री उशिरा जेवण केल्याने नीट पचन होत नाही आणि लठ्ठपणा झपाट्याने वाढतो. त्यामुळे वजन कमी करायचे असेल तर आजच उशिरा जेवणाची सवय सोडा. त्याचवेळी, रात्रीचे जेवण आणि झोपेमध्ये किमान 3 तासांचे अंतर ठेवा.

फायबरयुक्त पदार्थ खा - 

जर तुम्ही लठ्ठपणाने त्रस्त असाल आणि मलायकाप्रमाणे तुमची फिगर परिपूर्ण बनवायची असेल तर रात्रीचे जेवण नेहमी हलके आणि आरोग्यदायी घ्यावे. वजन कमी करण्यासाठी रात्रीच्या जेवणात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा. अशावेळी रात्रीच्या जेवणात तुम्ही सूप, कोशिंबीर, रोटी, डाळ इत्यादींचा समावेश करु शकता. यामुळे तुमचे पोटही भरेल आणि वजनही वाढणार नाही. 
 
साधारण गरम पाणी प्या - (कोमट पाणी)

जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर रात्रीच्या जेवणानंतर नक्कीच साधारण गरम पाणी प्या अर्थात ते कोमट असावे. जास्त गरम असून नये. यामुळे अन्नाचे पचन होण्यास मदत होईल आणि वजन कमी करणे सोपे होईल. ग्रीन टी प्यायल्याने चयापचय क्रिया चांगले होते. ज्यामुळे शरीरातील चरबी बर्न होण्यास मदत होते. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)