जपानी तरुणानं शोधलाय आयुष्य दुप्पट करण्याचा फॉर्मुला! 12 वर्षापासून पाळतोय 'ही' दिनचर्या!

Daisuke Hori sleep routine:  तुम्ही दिवसातले किती तास झोपता? किमान 8 तास तरी झोप असावी असं तज्ञ सांगतात. यामुळे तुमचा दिवसही चांगला जातो, असं म्हणतात. पण..

Pravin Dabholkar | Updated: Sep 3, 2024, 11:21 AM IST
जपानी तरुणानं शोधलाय आयुष्य दुप्पट करण्याचा फॉर्मुला! 12 वर्षापासून पाळतोय 'ही' दिनचर्या! title=
जपानीस तरुणानं शोधलाय आयुष्य दुप्पट करण्याचा फॉर्मुला

Daisuke Hori sleep routine: आपल्या जास्तीत आयुष्य जगता यावं असं प्रत्येकाला वाटतं. पण सध्याच्या धावपळ आणि फास्टफूडच्या लाईफस्टाइलमध्ये हे शक्य होईल असं वाटत नाही. पण एका जापनीस तरुणानं आयुष्य दुप्पट करण्याची क्लुप्ती शोधून काढलीय. त्याच्या या क्लुप्तीचं जगभरात कौतुक होतंय. मेहनत आणि शिस्तीशिवाय कोणती गोष्ट साध्य होत नाही. त्यामुळे त्यालादेखील यासाठी त्याला दररोज मेहनत घ्यावी लागते. डायसुकी होरी असे त्याचे नाव असून तो जपानच्या ह्योगो प्रांतात राहतो. 

तुम्ही दिवसातले किती तास झोपता? 

तुम्ही दिवसातले किती तास झोपता? किमान 8 तास तरी झोप असावी असं तज्ञ सांगतात. यामुळे तुमचा दिवसही चांगला जातो, असं म्हणतात. पण जापानचा डायसुकी होरी हा 40 वर्षांचा असून मागच्या 12 वर्षात त्याने दिवसाची केवळ 30 मिनिटे इतकी झोप घेतली आहे.  माझं आयुष्य दुप्पट करण्यासाठी मी या दिनचर्येचं पालन करायचा. मी माझ्या शरीर आणि मनाला अशाप्रकारे ट्रेण्ड केलंय की केवळ 30 मिनिटाची झोप झाल्यानंतर माझे शरीर पुन्हा कामासाठी तयार होते. झोप केवळ 30 मिनिटे मर्यादित ठेवल्याने माझी कार्यक्षमता सुधारल्याचे तो सांगतो.

जेवणाच्या आधी कॉफीच्या सेवनाचा मिळतो फायदा 

डायसुकी होरीने दिलेल्या महितीनुसार तुम्ही नियमित व्यायाम करताय आणि खाण्याच्या एक तास आधी कॉफी पिताय तर तुम्हाला उत्साह जाणवू शकतो. मन लावून काम केलात तर तुम्हाला चांगल्या झोपेऐवजी गाढ झोप येईल. ज्यांना आपल्या कामासाठी निरंतर एकाग्रता पाहिजेय. त्यांना जास्त झोपेपेक्षा  चांगल्या गुणवत्तेची झोप घ्यायला हवी. 

 लोकांना झोप आणि आरोग्यासाठी मार्गदर्शन 

होरी खरंच 30 मिनिटे झोपतो का? हे पाहण्यासाठी जापानच्या योमीउरी टीव्हीने 'विल यू गो विद मी' नावाचा रिअॅलिटी शोच्या माध्यमातून 3 दिवस त्याच्यावर नजर ठेवली. तो केवळ 26 मिनिटेच झोपतो, असे यात दिसून आले. यानंतर तो एकदम ताजातवाना होतो. होरी जापानमध्ये 2016 पासून शॉर्ट स्लीपर्स ट्रेनिंग असोसिएशनदेखील चालवतो. यामध्ये तो लोकांना झोप आणि आरोग्यासाठी मार्गदर्शन करतो. होरीने आतापर्यंत 2 हजार 100 हून अधिक जणांना अल्ट्रा-शॉर्ट स्लीपर्सची ट्रेनिंग दिलीय. 

 60 वर्षे झोपलोच नसल्याचा दावा

व्हिएतनामच्या 80 वर्षीय थाई एनगोक यांनी आपण 60 वर्षे झोपलोच नसल्याचा दावा केला होता.1962 मध्ये आजारातून बाहेर आल्यानंतर माझी झोपण्याची क्षमता संपल्याचे त्यांनी सांगितले. विविध उपचार आणि गोळ्या खावूनदेखील मला झोप न आल्याचे त्याने सांगितले.