Side Effects Of Drinking Water : पाणी हे जीवन आहे. पाणी पिणे कधीही चांगले असते. पाणी पिणे हे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. मात्र, दिवसभरात 7-8 ग्लास पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. भरपूर पाणी प्यायल्यास अनेक आजारांपासून तुमची सुटका होते. मात्र, पाणी पिण्याची योग्य वेळही खूप महत्त्वाची असते. अन्न खाल्ल्यानंतर पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले नाही. किमान अर्धा तास तरी पाणी पिऊ नये. तसेच काही वस्तू खाल्ल्यानंतर पाणी पिणे आरोग्यासाठी खूप घातक ठरु शकते. जाणून घ्या कोणत्या वस्तू खाल्यानंतर पाणी पिऊ नये ते.
आपल्या आरोग्यासाठी दूध (Milk) महत्वाचा घटक आहे. मात्र, दूध घेतल्यानंतर पाणी पिऊ नये. याचा तुमच्या पचनसंस्थेवर वाईट परिणाम होऊ शकतो. दुधानंतर पाणी प्यायल्याने पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.
स्ट्रॉबेरीची (Strawberry) आंबट-गोड चव सर्वांनाच आवडते. हे आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे, परंतु ते खाल्ल्यानंतर पाणी पिणे खूप हानिकारक आहे. स्ट्रॉबेरीमध्ये असलेली नैसर्गिक साखर आणि यीस्ट पाण्यासोबत मिसळून गॅस तयार करु शकतात. यामुळे अॅसिडिटी आणि पोटदुखीची समस्या उद्भवू शकते.
शेंगदाण्यामध्ये (Groundnut) भरपूर पोषक घटक असतात. त्यात तेल आणि फॅटही मुबलक प्रमाणात असते, त्यामुळे शेंगदाणे खाल्ल्यानंतर पाणी पिणे धोकादायक असते. शेंगदाणे खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्याने सर्दी-खोकल्याचा त्रास होऊ शकतो.
ब्लॅकबेरी (blackberry) खायला खूप चविष्ट लागते. ब्लॅकबेरी खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये, अन्यथा आजारी पडू शकता. ब्लॅकबेरी खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यास सर्दी, खोकला यांसारख्या समस्या होऊ शकतात. त्यामुळे दातांमध्ये वेदना निर्माण होण्याचा धोका असतो.
सफरचंदमध्ये (apple) लोह, जीवनसत्त्वे आणि फायबर यांसारख्या पोषक तत्वांचा समावेश असतो. ते खाल्ल्यानंतर पाणी पिणे टाळा. सफरचंदानंतर पाणी प्यायल्याने आतड्यांना हानी पोहोचते.
कलिंगडमध्ये (watermelon) भरपूर पाणी असते, परंतु असे असतानाही अनेकजण कलिंगड खाल्ल्यानंतर पाणी पिण्यास सुरुवात करतात. हे करणे टाळा. कलिंगडखाल्ल्याने पाचक रस पातळ होतो. त्यामुळे पोट फुगणे, अपचन यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)