फोनचा रिचार्ज करायला बाहेर पडली ती परतलीच नाही, 4 दिवसांनी नदी किनारी सापडला मृतदेह, घडलं भयंकर

Aasam Crime News: आसाम जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 16 वर्षांच्या तरुणीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली आहे. 

Updated: Jul 3, 2023, 04:32 PM IST
फोनचा रिचार्ज करायला बाहेर पडली ती परतलीच नाही, 4 दिवसांनी नदी किनारी सापडला मृतदेह, घडलं भयंकर title=
16 Years Old Girl Raped and Murdered In Aasam

गुवाहाटीः आसाममधून (Aasam Crime News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 16 वर्षांच्या मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. इतकंच नव्हे तर, नराधमाने हत्येनंतर तिचा मृतदेह नदीत फेकून दिल्याचं अमानुष कृ्त्य केलं आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आसाम राज्यातील कामरुप जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे. (16 Years Old Girl Raped In Aasam)

मोबाईल फोनचा रिचार्ज करायला बाहेर पडली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी इयत्ता आठवीत शिकत होती. सोमवारी तिच्या फोनचा रिचार्ज करण्यासाठी ती घराबाहेर पडली होती. मात्र त्यानंतर ती घरी परतलीच नाही. घरच्यांनी तिला सगळीकडे शोधले मात्र ती कुठेच सापडली नाही. अखेर कुटुंबीयांनी पोलिसांकडे ती हरवल्याची तक्रार दाखल केली. 

नदी किनारी सापडला मृतदेह

शुक्रवारी दिग्राऊ नदी किनारी एका मुलीचा मृतदेह सापडला. पोलिसांनी मृत अल्पवयीन मुलीची ओळख पटवल्यानंतर पुढील कारवाईला सुरुवात केली. दरम्यान, मुलीचा मृतदेह सापडल्यानंतर गावकरी आक्रमक झाले होते. मारेकऱ्याला लवकरात लवकर अटक करण्यात यावे यासाठी गावकऱ्यांनी पोलिस ठाण्यावर मोर्चा नेला होता. 

आरोपीने केला गुन्हा कबुल

गावकऱ्याचा वाढता आक्रोश पाहता पोलिसांनी तात्काळ तपास सुरु केला. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत एका रिक्षा चालकाला अटक केली. बबलु तुमांग असं आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याने गुन्हा कबुल केला आहे. तरुणीवर बलात्कार करुन हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करुन पोलीस कोठडी सुनावली आहे.

अहमदनगरमध्ये भररस्त्यात तरुणीची छेड

दरम्यान, नगरमध्येही एक भयावह प्रकार उघडकीस आला आहे. हमदनगर जिल्ह्यात  अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बस स्थानकजवळ उभे असतानाच भरदिवसा तरुणीची आरोपीने छेड काढल्याचे समोर आले आहे. बसस्थानकाजवळच आरोपीने दोन बहिणींची छेडछाड केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. छेडछाड होत असनाता स्थानिकांनी आरोपीला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणाची दखल घेत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.