नई दिल्ली: 7th Pay Commission News : केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आज, बुधवार, 30 मार्च रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत DA (Dearness allowance Hike) मध्ये 3% वाढ मंजूर करण्यात आली आहे. नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी कर्मचाऱ्यांचा डीए 31 टक्क्यांवरून 34 टक्के झाला आहे. कालच 'झी 24 तास'ने ही बातमी दिली होती की, आज केंद्रीय कॅबिनेट बैठकीत या विषयी निर्णय होऊ शकतो.
AICPI-IW च्या डिसेंबरच्या डेटापासून कर्मचारी 3% DA वाढीच्या घोषणेची वाट पाहत होते. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत 3% डीए वाढीची घोषणा करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांच्या मार्च महिन्याच्या पगारासह नवीन डीए खात्यात जमा केला जाईल.
आता कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 34% दराने महागाई भत्ता मिळेल. औद्योगिक कामगारांसाठी डिसेंबर 2021 च्या ग्राहक किंमत निर्देशांकात एका अंकाची घट झाली आहे. महागाई भत्त्यासाठी सरासरी 12 महिन्यांचा निर्देशांक सरासरी 34.04% सह 351.33 आहे. सरकारच्या या निर्णयाचा फायदा 50 लाखांहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारकांना होणार आहे. आता पुढील महागाई भत्ता जुलै 2022 मध्ये मोजला जाईल.
कामगार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, AICPI-IW निर्देशांक नोव्हेंबर 2021 मध्ये 0.8% वाढला होता आणि 125.7 वर पोहोचला होता. यावरून महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ होणार असल्याचे स्पष्ट झाले.
आता, डिसेंबर 2021 च्या आकड्यात थोडीशी घट झाली असली तरी, जानेवारी 2022 पासून DA मध्ये 3% वाढ जाहीर करण्यात आली आहे.