नवी दिल्ली : भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रविवारी आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, भारतात आतापर्यंत 3374 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यापैकी 3034 लोक अद्याप कोरोनाबाधित असून त्यापैकी 266 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आकडेवारीनुसार, देशभरात 79 लोकांचा मृत्यू झाला आहे.
गेल्या 24 तासांत भारतात कोरोनाचे 472 नवे रुग्ण आढळले आहेत. तर गेल्या 24 तासांत 11 कोरोना रुग्णांना मृत्यू झाला आहे.
274 जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. लॉकडाऊन हा कोरोना रोखण्याचा उपाय आहे. सोशल डिस्टंसिंग हीच कोरोनावरची लस आहे.12.50 लाख लोकांना आश्रय देण्यात आला आहे. सामाजिक संस्थांची 3733 निवारा केंद्रे, तर बेघरांसाठी 28 हजार निवारा केंद्रे असल्याची माहिती आरोग्य विभागाने घेतलेल्या परिषदेत देण्यात आली आहे.
अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरुच राहणार असल्याचं आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशमध्ये 161 कोरोनाग्रस्त असून एकाला डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर एकाचा मृत्यू झाला आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये 1, आसाममध्ये 24 कोरोना रुग्ण आहेत. बिहार 30 कोरोनाग्रस्त असून एकाचा मृत्यू झाला आहे. चंदीगडमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा 18वर पोहचला आहे. तर छत्तीसगडमध्ये 9 कोरोनाबाधित आहेत.
दिल्लीत कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतो आहे. दिल्लीत आतापर्यंत 445 लोक कोरोनाग्रस्त आहेत. त्यापैकी 15 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 6 जणांचा मृत्यू झाला आहे.
गोवामध्ये 7 कोरोनाग्रस्त आहेत. गुजरातमध्ये 105 लोक कोरोनाबाधित असून 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 14 जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय. हरियाणामध्ये 49 कोरोनाग्रस्त असून 24 जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय.
हिमाचलमध्ये 6 प्रकरणं समोर आली असून एकाचा मृत्यू झाला आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये आतापर्यंत 92 प्रकरणं समोर आली असून 4 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला असून दोघांचा मृत्यू झाला आहे.
झारखंडमध्ये दोन कोरोनाबाधित आढळले आहेत. केरळमध्ये 306 कोरोनाग्रस्त असून 49 जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय तर दोघांचा मृत्यू झाला आहे. कर्नाटकात 144 प्रकरणं समोर आली असून 12 लोकांना डिस्चार्ज तर 4 जणांचा मृत्यू झाला आहे.
लडाखमध्ये 14 कोरोनाग्रस्त आढळून आले असून त्यापैकी 10 जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
मध्यप्रदेशमध्ये कोरोना पीडितांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत मध्यप्रदेशमध्ये 104 प्रकरणं असून 6 जणांचा मृत्यू झाला आहे.
मणिपूरमध्ये 2 तर मिझोराममध्ये 1 कोरोना रुग्ण आढळला आहे. ओडिशामध्ये 20, पाँडिचेरीमध्ये 5 कोरोनाग्रस्त सापडले आहेत.
पंजाबमध्ये 57 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 5 जणांचा मृत्यू झाला आहे. राजस्थानमध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सतत वाढ होत आहे. ही संख्या 200वर पोहचली आहे. तर 21 लोकांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे.
तमिळनाडूमध्ये आतापर्यंत 485 कोरोनाग्रस्त आढळले असून 6 जणांना डिस्चार्ज करण्यात आलं आहे. तर 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तेलंगानामध्ये 269 प्रकरणं असून 7 जणांचा मृत्यू झालाय. तर 32 लोकांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. उत्तराखंडमध्ये 22 प्रकरणं समोर आली आहेत. दोघांना रुग्णालयातून सोडण्यात आलं आहे.
उत्तरप्रदेशातही आकडा वाढतो आहे. 227 कोरोनाबाधित आढळले असून 2 जणांचा मृत्यू झाला आहे. 19 जणांचा डिस्चार्ज करण्यात आलं आहे. पश्चिम बंगालमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा 69वर पोहचला असून 10 जणाचा घरी सोडण्यात आलं आहे. पश्चिम बंगालमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे.