Mumbai News : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी सोमवारी बेंगळुरू येथे अंमली पदार्थांची तस्करी आणि राष्ट्रीय सुरक्षा या विषयावरील प्रादेशिक परिषदेचे सहभाग घेतला होता. या परिषदेत 5 दक्षिण आणि 3 केंद्रशासित प्रदेशातील प्रतिनिधी सहभागी झाले होते. यादरम्यान देशाच्या विविध भागात 2,381 कोटी रुपयांचे 1.44 लाख किलोहून अधिक अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले. अमित शहा यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या संपूर्ण कारवाईचे कामकाज पाहिले. दरम्यान, महाराष्ट्र पोलिसांनी (Maharashtra Police) सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आभासी उपस्थितीत 598 किलो ड्रग्ज नष्ट केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या अमली पदार्थांची एकूण किंमत 73.36 कोटी रुपये होती.
हे अमली पदार्थ दहशतवादी विरोधी पथक आणि मुंबई पोलिसांनी स्वतंत्रपणे जप्त केले होते. नवी मुंबईतील तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेडच्या एका केंद्रात याची विल्हेवाट लावण्यात असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दहशतवाद विरोधी पथकाने चार वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये 64.36 कोटी रुपयांचे 161 किलो ड्रग्ज आणि सायकोट्रॉपिक ड्रग्ज जप्त केले होते, जे सोमवारी नष्ट करण्यात आले, तर मुंबई पोलिसांनी 9 कोटी रुपयांचे 437 किलो ड्रग्ज नष्ट केले आहेत. एका अधिकाऱ्याने सांगितले की, मुंबई पोलिसांनी गेल्या तीन महिन्यांत 5,000 कोटी रुपयांच्या 4,000 किलो ड्रग्जची विल्हेवाट लावली आहे.
75 दिवसांत 8409 कोटींचे अमली पदार्थ नष्ट - अमित शाह
"1 जून 2022 पासून देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू झाला आहे. ज्या अंतर्गत 75 दिवसांच्या मोहिमेत 75,000 किलो ड्रग्ज नष्ट करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. मात्र आम्ही आतापर्यंत 8,409 कोटी रुपयांचे 5,94,620 किलो ड्रग्ज नष्ट केले आहेत, जे लक्ष्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. त्यापैकी 3138 कोटी रुपयांचे (1,29,363 किलो) अमली पदार्थ एकट्या एनसीबीने नष्ट केले आहेत," असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले.
#WATCH | Today in the virtual presence of the Union Home Minister Amit Shah, Mumbai police team, incinerated 437 kgs of Drugs worth Rs 9 Crore.
In the last only 3 months, record break drug disposal of 4,000 kg of drugs worth Rs 5,000 crore has been done by Mumbai police.
(Video… pic.twitter.com/DtCWCT66VX
— ANI (@ANI) July 17, 2023
देशात अमली पदार्थांच्या तस्करीचे रॅकेट - अमित शाह
"अमली पदार्थांची तस्करी ही केवळ राज्य किंवा केंद्राची नसून ती राष्ट्रीय समस्या आहे. याला सामोरे जाण्यासाठी जिल्हा आणि राज्य पातळीवर काम करण्याची गरज आहे. देशात अमली पदार्थांच्या तस्करीचे एक संपूर्ण रॅकेट आहे, त्याचा छडा लावण्यासाठी तपास करण्याची गरज आहे. 2006 ते 2013 दरम्यान देशात अंमली पदार्थांच्या तस्करीचे 1257 प्रकरणे नोंदवण्यात आली होती, जी 2014 ते 2022 मध्ये 152 टक्क्यांनी वाढून 3172 झाली. तर, 2006 ते 2013 दरम्यान, 1362 पासून 4888 पर्यंत ही प्रकरणे पोहोचली आहे. 2006 ते 2013 दरम्यान 1.52 लाख किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले होते, जे 2014 ते 2022 दरम्यान दुप्पट होऊन 3.30 लाख किलो झाले. 2006 ते 2013 या कालावधीत 768 कोटी रुपयांची औषधे जप्त करण्यात आली होती," अशीही माहिती अमित शाह यांनी दिली.