पाय धरले, नाक घासलं; बापाच्या डोळ्यातील अश्रू पाहूनही थांबली नाही लेक; पाहा हृदय पिळवटून टाकणारा Video

Viral Video: प्रेमप्रकरणामुळे अनेक तरुण तरुणी आपल्या आई वडिलांचा विचार करत नाहीत. मुलांनी आई वडिलांना (Father Emotional video) विश्वासात घेणं घ्यायला हवं. त्याचबरोबर आई वडिलांनी देखील मुलांशी या विषयावर संवाद साधणं गरजेचं आहे.

सौरभ तळेकर | Updated: Jun 4, 2023, 08:17 PM IST
पाय धरले, नाक घासलं; बापाच्या डोळ्यातील अश्रू पाहूनही थांबली नाही लेक; पाहा हृदय पिळवटून टाकणारा Video title=
Emotional Viral video of father

Viral Video: जन्मत: प्रेमाची संकल्पना रुजली जाते ती आपल्या माणसांकडून. कुटुंब व्यवस्थेचा मुलांवर खूप मोठा पगडा असतो. आई वडील आपल्या मुलांवर खूप प्रेम करतात. मुलांना चांगलं शिक्षण मिळावं. भरघोस पगाराची नोकरी लागावी आणि सेलट होऊन सुखी आयुष्य जगावं, अशी पालकांची इच्छा असते. लहानपणी शब्द खाली पडू न देणारी मुलं वयात आली की आई वडिलांचं ऐकत नाही, असं सर्रास पहायला मिळतं. महत्त्वाचे निर्णय घेताना आई वडिलांना विचारावं, असंही त्यांना वाटत नाही. अशातच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Viral Video) होत आहे. या व्हिडिओने अनेक नेटकऱ्यांचं हृदय पिळवटून टाकलंय.

गेल्या अनेक दिवसांपासून प्रेमविवाहाचं फ्यॉड वाढत चाललंय. तुमच्या परिसरात एखादा मुलगा पळून गेली किंवा मुलगी पळून गेली, अशी बातमी ऐकली असेल. समाजात चर्चा होते किंवा बदनामी होते म्हणून आई वडिलांना देखील धास्ती बसलेली असते. त्यामुळे आई वडिल मुलींना किंवा मुलांना दडपणाखाली ठेवण्याचा प्रयत्न करतात. याला काही अपवाद नक्कीच आहेत. मात्र, सध्या सर्वांच लक्ष वेधून घेणाऱ्या व्याकूळ झालेल्या बापाचा व्हिडिओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये (Banaskantha video viral) एक बाप आपल्या मुलीला अडण्याचा प्रयत्न करतोय. मुलीने घरातून पळून जाऊन प्रियकरासोबत लग्न केलं होतं. तेव्हापासून तरुणी तिच्या प्रियकरासोबत राहत होती. मुलगी अचानक गायब झाल्याने भंबेरी उडालेल्या पालकांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी देखील कसून शोध घेतला आणि मुलीला पालकांसमोर उभं केलं. मुलीने केलेला प्रताप पाहून पालकांना आश्चर्याचा धक्का बसला. मात्र, मुलीने पालकांना ओळखण्यास नकार दिला. पालकांना मुलीला समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरुणी प्रियकरासह जाऊ लागली. त्यावेळी खांद्यावर शर्ट फाटलेल्या बापानं मुलाला थांबण्याचा प्रयत्न केला. 

आणखी वाचा - Asur 2 review: मानवी नैतिकता चांगली की वाईट? ट्विस्ट, सस्पेन्स आणि थ्रिलर वेब सिरीज 'असूर 2' नक्की पाहा!

हतबल बापानं प्रियकराचे पाय धरले, त्याच्या समोर नाक घासलं आणि मुलीला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, बापाच्या डोळ्यातील अश्रू पाहून देखील मुलीला थांबावसं वाटलं नाही. प्रेमप्रकरणामुळे अनेक तरुण तरुणी आपल्या आई वडिलांचा विचार करत नाहीत. मुलांनी आई वडिलांना विश्वासात घेणं घ्यायला हवं. त्याचबरोबर आई वडिलांनी देखील मुलांशी या विषयावर संवाद साधणं गरजेचं आहे.

पाहा Video

दरम्यान, अशा अनेक मुली किंवा मुलं असतात, जे आईवडिलांच्या मायेपोटी किंवा त्यांच्या सामाजिक प्रतिमेसाठी प्रेमाची आहुती देतात. त्यांच्यासाठी प्राधान्यक्रम महत्त्वाचा असतो. त्यामुळे कोणचाही निर्णय घेण्याआधी मुलांनी दोन्ही बाजूने विचार करणं गरजेचं आहे.