हरियाणा : राज्यात एक धक्कादायक बाब पुढे आली आहे. चक्क गावात मुलींना मोबाईल वापरणे आणि जीन्स घालण्यावर बंदी आणण्यात आलेय. तसा फतवा गाव पंचायतीने काढलाय. त्यामुळे या गावात यापुढे मुली मोबाईल वापरु शकत नाही आणि जीन्स पॅंट परिधान करु शकत नाही. या फतव्याला ग्रामस्थांचा पाठिंबा असल्याचा दावा बंदी घातल्यात आलेल्या गावच्या सरपंचानी केलाय. दरम्यान, गाव पंचायतींवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. असे असताना हा निर्णय घेण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
मोबाइलचा वापर आणि त्यावर बोलत राहणे तसेच जीन्स घातल्याने मुली मुलांसोबत पळून जातात. त्यामुळे गावातील एकाही तरुणीला जीन्स परिधान करता येणार नाही आणि जवळ मोबाइलही बाळगता येणार नाही, असा फतवा हरियाणातील सोनीपत जिल्ह्यातील एका गाव पंचायतीने काढलाय. या फतव्याची अंमलबजावणी ग्रामपंयातीने लागू केलेय. सरपंच यांनी गावकऱ्यांचा हवाला देऊन या बंदीला मान्यता असल्याचे सांगत जाहीरपणे समर्थन दिलेय.
सर्वोच्च न्यायालयाने खाप पंचायतींवर बंदी घातली असली तरी ईशापूर गाव पंचायतीने मात्र हा बंदीचा फतवा काढलाय. गावातील तीन मुलींनी प्रियकरांसमवेत पळून गेल्या. त्यांनी नंतर विवाहही केल्याने हा फतवा काढल्याचे सरपंचाने सांगितले. त्याच्या म्हणण्यानुसार, या तिन्ही मुली नेहमी जीन्स घातल होत्या. त्यांच्याकडे मोबाइलही होता, असे सरपंच प्रेम सिंग यांचे म्हणणे आहे. या मुलींकडे मोबाइल नसता, तर त्या पळून गेल्या नसत्या, असा अजब दावाही करताना गावाबाबत निर्णय घेण्याचे अधिकार आपल्याला आणि पंचायतीला आहेत, असेही सांगितले.
दरम्यान, आपले समर्थन करताना तिन्ही प्रकरणांमुळे आमच्या गावाची आणि पंचायतीची बदनामी झाली आहे. त्यामुळे आम्ही सर्व पंचांनी मिळून हा निर्णय घेतला. गाववकऱ्यांनी त्याला मान्यता दिली, असा दावा सरपंच प्रेम सिंह यांनी केलाय. दरम्यान, पोलिसांनी गाव पंचायतीच्या निर्णयाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आलाय.