नवी दिल्ली : क्रिकेटच्या मैदानातून राजकारणाच्या मैदानातून आलेल्या क्रिकेटर गौतम गंभीर याने खूप कमी दिवसात राजकारणातील बारकावे शिकला आहे. दिल्लीच्या रामलीला मैदानातील प्रचार सभेची ओपनींग करणअयाची संधी गौतम गंभीरला मिळाली. यावेळी त्याने जोरदार बॅटींग करत आम आदमी पक्षावर निशाणा साधला.
मला लोक विचारतात की तू क्रिकेटमधून राजकारणात आल्यावर काय शिकलास ? यावर मी त्यांना एकच उत्तर देतो की, लढाई लढायची असेल तर समोरासमोरची असावी..पाठीमागून वार नको..गेल्या 15 दिवसात आम आदमी पक्षाने माझ्यावर खूप केले. कधी माझा उमेदवारी अर्ज रद्द करण्याचा प्रयत्न केला तर माझ्यावर एफआयआर देखील केली. कधी म्हटलं की मी 240 दिवस देशाच्या बाहेर राहीन तर कधी म्हटलं की वादविवादाला घाबरतो...मी अशा लोकांना एकच सांगू इच्छितो जो पाकिस्तानला घाबरला नाही तो वादविवाद करायला का घाबरेल ? असा प्रश्न गौतम गंभीरने उपस्थित केला.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर होणाऱ्या हल्ल्यांचे प्रमाण वाढत आहे. हे भाजपाचे षढयंत्र असल्याचे केजरीवालांनी म्हटले होते. यावरही गौतम गंभीर याने प्रतिक्रीया दिली. केजरीवाल अजून इतकेही मोठे नेता बनले नाहीत की भाजपाला त्यांच्याविषयी विचार करावा लागेल असा टोला गंभीरने लगावला. गेल्या साडे चार वर्षातील नाकर्तेपणा लपवण्यासाठी भाजपावर आरोप लावले जात असल्याचे गंभीर म्हणाला.
प्रचारादरम्यान खालच्या भाषेत टीका करत असल्याच्या काँग्रेसच्या आरोपाला बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सणसणीत प्रत्युत्तर दिले. यावेळी त्यांनी विरोधकांनी आपल्याला कशाप्रकारे हिणवले होते, याचा सविस्तर तपशीलच सादर केला. माझ्यावर टीका करताना या लोकांनी कित्येकदा पातळी सोडली होती. त्यांनी माझ्यासाठी वापरलेल्या 'लव्ह डिक्शनरीकडे' पाहिल्यास त्याची कल्पना येईल. काँग्रेसच्या नेत्यांनी तर माझ्या आईलाही सोडले नाही. काँग्रेसच्या एका नेत्याने मला 'गंदी नाली का कीडा' म्हटले होते. तर काही जणांनी पिसाळलेला कुत्रा, रावण, साप, विंचू, घाणेरडा माणूस, मौत का सौदागर, हिटलर आणि मुसोलिनी म्हणत मला शिव्या दिल्या. एवढेच नव्हे त्यांनी माझे वडील कोण आहेत?, असा प्रश्न विचारून माझ्या आत्मसन्मानालाही धक्का लावण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे हे सगळे मी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यावर घडले. मी काँग्रेसच्या घराणेशाहीच्या राजकारणाला आव्हान दिल्यामुळेच त्यांनी माझ्यावर अशाप्रकारे टीका केल्याचे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.