धक्कादायक : घरासाठी मुलाने केली आईची हत्या

दिल्लीतील रोहिणी परिसरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Mar 5, 2018, 12:12 PM IST
धक्कादायक : घरासाठी मुलाने केली आईची हत्या

नवी दिल्ली : दिल्लीतील रोहिणी परिसरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. 

दैनिक भास्करने दिलेल्या माहितीनुसार 159 वर्ष पूर्वीच्या घरासाठी एका 27 वर्षाच्या मुलाने चक्क आपल्या आईची हत्या केली आहे. एवढंच नाही तर हत्येचे सर्व पुरावे नष्ट करण्यासाठी केलेलं कृत्य अतिशय धक्कादायक आहे. मुलाने आईच्या हत्येनंतर सर्वात पहिले तिचा मृतदेह जाळला आहे. आणि अर्धजळलेलं शरिर शेतात फेकून दिलं. आणि एवढ्यावरच न थांबता आईच्या हरवण्याची तक्रार नोंदवली आहे. 

रिपोर्ट दाखल केल्यानंतर शाहबाद डेअरी ठाण्यातील पोलिसांना लावारिस मृतदेह सापडला. त्याची चौकशी करण्यासाठी त्यांनी अनिलच्या बहिणीला पोलीस ठाण्यात बोलावलं. जिन्हे अंगठ्यांच्या मदतीने आपल्या आईच्या मृतदेहाला ओळखलं आहे. 

त्यानंतर पोलिसांना तपासात ही माहिती शोधून काढलं की मुलाने आपल्या आईचा खून केल्याचा तपास लागला आहे.