लग्नाच्या स्टेजवर घडला विचित्र प्रकार, नवरदेवाच्या जागी प्रियकरानं घातला हार आणि...

गावातील एका लग्नादरम्यान  विचित्र प्रकार पाहायला मिळाला. ज्यामुळे उपस्थीत सगळ्याच लोकांना धक्का बसला आहे.

Updated: May 5, 2022, 05:34 PM IST
लग्नाच्या स्टेजवर घडला विचित्र प्रकार, नवरदेवाच्या जागी प्रियकरानं घातला हार आणि... title=

मुंबई : लग्न म्हटलं की मजा, मस्करी या सगळ्या गोष्टी येतात. प्रत्येक मुलगा आणि मुलगी आपल्या आयुष्यातील या महत्वाच्या क्षणाची आतुरतेनं वाट पाहत असतो. म्हणून या दिवशी सगळं काही आपण ठरवल्याप्रामाणे सगळं ठिक व्हावं असं प्रत्येकाला वाटत असतं, परंतु या एका लग्नात काही भलताच प्रकार घडला. हा संपूर्ण प्रकार नवरदेवाच्या डोळ्यांसमोरच घडला, ज्यामुळे त्याला देखील धक्का बसला.

बिहारची राजधानी पाटणा येथील एरे गावात लग्नादरम्यान एक विचित्र प्रकार पाहायला मिळाला. येथे जयमलच्या वेळी एका प्रियकराने वराच्या हातातील माळा हिसकावून वधूच्या गळ्यात घातला आणि त्यानंतर लगेचच सिंदूर देखील नववधूच्या भांगात भरला. या संपूर्ण घटनेने सगळेच लोक हैराण झाले आहेत. ज्यानंतर या प्रियकराला उपस्थीत सगळ्या लोकांना स्टोजवरुन खाली आणले आणि बेदम मारहाण केली. 

यादरम्यान नववधूने आपल्या प्रियकराला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले. परंतु त्याचा काही फायदा झाला नाही. अखेरीस स्थानिकांनी तरुणाला पोलिसांच्या ताब्यात दिले.

त्याचवेळी लग्न न करता वरात. आल्या पावली परतली, कारण हे सगळं प्रकरण घडल्यानंतर वराने लग्नाला नकार दिला. त्याचं असं म्हणणं आहे की, जर नववधूचं दुसऱ्यावर प्रेम असेल, तर मग मी तिच्या लग्न का करु असा नवरदेवानं प्रश्न उपस्थीत केला.

मुलीच्या वडिलांनी तिचे लग्न नवादा जिल्ह्यातील जवाहर नगर येथील रहिवासी दिवाकर पांडे यांचा मुलगा अक्षय कुमार याच्यासोबत निश्चित केले होते. मिरवणूक बॅण्ड वाजवत इरे गावात पोहोचली.

रात्री 11.12 च्या सुमारास जयमाला घालण्याचा कार्यक्रम सुरु होता. वधू-मैत्रिणीच्या हाकेवर खगरिया येथील तिचा प्रियकर अमित कुमार स्टेजवर पोहोचला. यानंतर प्रियकराने वराच्या हातातील माळा हिसकावून थेट वधूच्या गळ्यात घातला.

मुलीच्या कुटुंबीयांनी शहाजहानपूर पोलिस ठाण्यात कोणतीही लेखी तक्रार केलेली नाही. अशा स्थितीत पोलिसांनी आरोपी अमित कुमारला पोलीस ठाण्यातून सोडले आहे. आता पुढे या प्रेमी युगुलाचं काय होईल, हे त्यांनाच माहित.