वाऱ्याच्या वेगाने पळवत होता Bike, समोरुन चुकीच्या दिशेने आली कार अन् एका सेकंदात...; फक्त एकच चूक झाली

हरियाणामधील (Haryana) गुरुग्राम (Gurugram) येथे दुचाकी आणि चारचाकीमध्ये धडक होऊन भीषण अपघात झाला. या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ (Viral Video) समोर आला असून, वेगात जाणाऱ्या दुचाकीने एसयुव्हीला धडक दिल्यानंतर तरुण चक्क हवेत उडतो.   

शिवराज यादव | Updated: Sep 20, 2024, 02:24 PM IST
वाऱ्याच्या वेगाने पळवत होता Bike, समोरुन चुकीच्या दिशेने आली कार अन् एका सेकंदात...; फक्त एकच चूक झाली title=

हरियाणामधील (Haryana) गुरुग्राम (Gurugram) येथे दुचाकी आणि महिंद्रा 3XO एसयुव्हीमध्ये जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की, दुचाकीस्वार अक्षत गर्गचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडीओ (Viral Video) समोर आला असून, तो पाहिल्यावर तुमच्या अंगावर काटा येईल. कार चालकाच्या एका चुकीमुळे अक्षत गर्गला आपला जीव गमवावा लागला आहे. 

अक्षत गर्ग रविवारी रात्री अत्यंत वेगाने दुचाकी चालवत होता. याचवेळी समोरुन महिंद्रा 3XO चुकीच्या दिशेने येत होती. अक्षत गर्गला समोरुन चुकीच्या दिशेने कार येत असल्याची काहीच कल्पना नव्हती. यानंतर तो त्याच वेगाना चारचाकीला धडक देतो. धडक इतकी जोरदार असते की तो हवेत फेकला जातो आणि रस्त्याशेजारी जाऊन पडतो. घटनास्थळी रुग्णवाहिका पोहोचल्यानंतरही अक्षत गर्गला वाचवण्यात यश आलं नाही. 

व्हायरल झालेल्या व्हिडीओत दिसत आहे की, अक्षतचा मित्र प्रद्युम्न अपघातानंतर त्याला उठवण्याचा प्रयत्न करत आहे. यावेळी त्याच्या रडण्याचा आवाजही ऐकू येत आहे. यावेळी प्रद्युम्न एसयुव्ही चालवणाऱ्या चालकाला तू चुकीच्या दिशेने गाडी का चालवत आहेस? अशी विचारणा करतो. तसंच तो लोकांना पोलिसांना बोलावण्यासही सांगत आहे. 

या अपघाताचा साक्षीदार आणि मृत अक्षतचा मित्र प्रद्युम्नचा आरोप आहे की, हा वेगाने वाहन चालवण्याची लेन होती जिथे आरोपी चुकीच्या दिशेने गाडी चालवत होता. प्रद्युम्नने याप्रकरणी तक्रारही केली आहे. 

पोलिसांनी चालकाला ठोकल्या बेड्या

पोलिसांनी या प्रकरणी कलम 106 (निष्काळजीपणामुळे मृत्यू), -281 (रॅश ड्रायव्हिंग), 324(4) (20,000 रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाल्यामुळे), 166 (मोटार वाहन अपघातानंतर नुकसान भरपाई) अशा कलमांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एसयुव्ही चालवणाऱ्या आरोपी कुलदीप ठाकूरला पोलिसांनी अपघातस्थळावरूनच अटक केली. मात्र, नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.