व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या आधार कार्डचे काय होते?

Aadhar Card After Deatth : तुम्ही कधी विचार केलाय की, एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या आधार कार्डाचे काय होते? मृत व्यक्तीचा आधारकार्ड सरेंडर करुन इनऍक्टिवेट करावा लागतो का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Jul 16, 2024, 05:39 PM IST
व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या आधार कार्डचे काय होते?  title=

आजच्या काळात आधार कार्ड (Aadhar Card) अतिशय महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. अगदी बँकेत असो किंवा कोणत्या हॉटेलमध्ये चेक इन करणं असो. ट्रेनचा प्रवास असो किंवा विमान तिकिट बुक करणे असूदे. सगळीकडेच आधारकार्ड अतिशय महत्त्वाचे ठरते. आधार कार्डवरील 12 अंकांचा युनिक नंबर अतिशय महत्त्वाचा ठरतो. आधारकार्डावर तुमचं नाव, पत्ता आणि फिंगरप्रिंट सारखे महत्त्वाचे डिटेल्स तेथे असतात. आधार कार्डाशिवाय कोणत्याही .सरकारी योजनाांचा तुम्ही लाभ घेऊ शकत नाही. 

त्यामुळे तुमचं आधारकार्ड गहाळ होणे ही अत्यंत चुकीची घटना आहे. अशावेळी तुम्ही आधार कार्ड जपून ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर त्याच्या आधार कार्डचे काय होते? हा प्रश्न देखील तितकाच महत्त्वाचा आहे. मृत व्यक्तीचे आधार कार्ड सरेंडर करावे लागते की इनऍक्टिवेट करावे लागते? यासगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण येथे पाहणार आहोत. 

आधार कार्ड सरेंडर केले जाऊ शकते किंवा बंद केले जाऊ शकते?

आधार कार्ड UIDAI (Unique Identification Authority of India) द्वारे जारी केले जाते. तुम्ही अल्पवयीन आणि नवजात मुलांसाठी आधार कार्ड देखील बनवू शकता. परंतु एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर आधार कार्ड कसे सरेंडर करायचे किंवा कसे बंद करायचे याबाबत अद्याप कोणतेही नियम बनवलेले नाहीत. म्हणजेच कुटुंबातील एखाद्याच्या मृत्यूनंतर तुम्ही त्याचे आधार कार्ड सरेंडर किंवा रद्द करू शकत नाही. मात्र, आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी UIDAI ने आधार लॉकची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. जेणेकरून तुमचा आधार सुरक्षित राहील आणि कोणीही त्याचा गैरवापर करू शकणार नाही.

आधार कार्डचा गैरवापर होण्यापासून टाळा 

लॉक या शब्दातूनच कळते की, आधार कार्ड लॉक केल्यानंतर त्याचा वापर करता येणार नाही. लॉक केलेले आधार कार्ड वापरण्यासाठी आधी ते अनलॉक करावे लागेल. तुमच्या कुटुंबातील एखाद्याचा मृत्यू झाल्यास, तुम्ही त्याचा/तिच्या आधार कार्डचा गैरवापर होऊ नये म्हणून लॉक करू शकता.

आधार कार्ड अशा प्रकारे लॉक करा

1. आधार लॉक करण्यासाठी, सर्वप्रथम UIDAI च्या अधिकृत वेबसाइट uidai.gov.in वर जा. त्यानंतर My Aadhaar या पर्यायावर क्लिक करा.
2. यानंतर, My Aadhaar मधील Aadhaar Services वर जा आणि 'लॉक/अनलॉक बायोमेट्रिक्स' चा पर्याय निवडा.
3. यानंतर स्क्रीनवर एक नवीन पेज उघडेल. या नवीन पेजवर लॉग इन करण्यासाठी, तुम्हाला 12 अंकी आधार क्रमांक आणि तुम्हाला लॉक करायचा असलेला आधारचा कॅप्चा कोड टाकावा लागेल आणि नंतर Send OTP वर क्लिक करावे लागेल.
4. आता त्या आधारशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर प्राप्त झालेला OTP भरा, त्यानंतर Lock/Unlock the biometric data मधून Lock पर्याय निवडा.

लॉकचा पर्याय निवडल्यानंतर, आधार कार्ड लॉक होईल. त्याचप्रमाणे, आधार कार्ड अनलॉक करण्यासाठी, तुम्हाला त्याच चरणांचे अनुसरण करावे लागेल आणि अनलॉक पर्याय निवडावा लागेल. आपला आधार चुकीच्या हातात जाण्यापासून वाचवण्यासाठी प्रत्येकाने या सुविधेचा वापर करावा.