नवीन वर्षात स्वतःला लावा 'या' 5 चांगल्या सवयी, 100 वर्षांपर्यंत राहाल फिट, आजपासूनच सुरुवात करा

Good Habits In New Year : नवीन वर्ष हे नेहमी आपल्याला उत्तम संधी देत असतं, तेव्हा जुन्या सवयी बदलून तुम्ही स्वतःच जीवन सुधारू शकता. नवीन वर्षात तुम्ही 5 चांगल्या सवयी अवलंबल्यास फिट राहून गंभीर आजारांपासून दूर राहू शकता. 

पुजा पवार | Updated: Jan 2, 2025, 04:05 PM IST
नवीन वर्षात स्वतःला लावा 'या' 5 चांगल्या सवयी, 100 वर्षांपर्यंत राहाल फिट, आजपासूनच सुरुवात करा  title=
(Photo Credit : Social Media)

Good Habits To Follow in New Year 2025: 2025 या नवीन वर्षाला सुरुवात झाली असून संपूर्ण जगभरात नवीन वर्षाचं सेलिब्रेशन केलं जात आहे. नवीन वर्ष हे नेहमी आपल्याला उत्तम संधी देत असतं तेव्हा जुन्या सवयी बदलून तुम्ही स्वतःच जीवन सुधारू शकता. नवीन वर्षात तुम्ही 5 चांगल्या सवयी अवलंबल्यास फिट राहून गंभीर आजारांपासून दूर राहू शकता. 

नवीन वर्षात 'या' पाच सवयी तुम्हाला ठेवतील फिट

आरोग्यदायी शरीरासाठी नियमितपणे व्यायाम किंवा अन्य कोणती फिझिकल ऍक्टिव्हिटी करणं गरजेचं आहे. तुम्ही जिम करा, चालायला जावा, योग करा अशाप्रकारे कोणत्या न कोणत्या प्रकारे शरीराला एक्टिव ठेवणे महत्वाचे असते. यामुळे तुमचं आरोग्य उत्तम राहील आणि एक्सरसाइज केल्याने तुमचे मसल्स देखील मजबूत राहतील. तुमचं मानसिक आरोग्य देखील चांगलं राहतं. एक्सरसाइज  केल्यामुळे हार्ट आणि फुफुसांचा आरोग्य देखील सुधारतं. दररोज 30 मिनिटं ते 1 तासभर व्यायाम केल्याने तुम्ही फिट राहता. 

सकस आहार गरजेचा : 

निरोगी राहण्यासाठी सकस आहार सुद्धा गरजेचा आहे.  नवीन वर्षात तुम्ही तुमच्या आहारात काही चांगले बदल करू शकता जे तुमच्या आरोग्यासाठी आणि शरीरासाठी फायदेशीर ठरतील. आहार करताना लक्षात ठेवा की तुमची खात असलेल्या अन्नात  प्रोटीन, कार्बोहाइड्रेट, हेल्दी फॅट, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सचा बॅलेन्स असतो. ताजी फळ, भाज्या आणि धान्य इत्यादी प्रोटिनने भरपूर असतात. निरोगी राहायचं असेल तर जंक फूड, शुगर ड्रिंक्स आणि फास्ट फूड खाणं टाळावं. 

7 ते 8 तासांची झोप : 

जर तुम्हाला तुमचे आरोग्य उत्तम राखायचे असेल तर पुरेशी झोप घेणं गरजेचं आहे. झोप शरीर आणि मेंदूच्या रिकव्हरीसाठी अत्यंत गरजेची असते. जर तुम्ही चांगली झोप घेत असाल तर तुमची शारीरिक क्षमताच नाही तर मानसिक स्थिती सुद्धा सुधारते. अनेक अभ्यासातून समोर आलं आहे की, एका व्यक्तीने दिवसातून 7 ते 8 तासांची झोप घ्यावी. 

हेही वाचा : हिवाळ्याच्या दिवसात सनस्क्रीन लावावं की नाही? पाहा तज्ज्ञांनी काय सांगितलं?

ताणतणाव : 

ताणतणाव हा मानसिक आरोग्यासाठी नाही तर शारीरिक आरोग्यावर सुद्धा परिणाम करतो. तुम्ही तणाव दूर करण्यासाठी योगासने, प्राणायाम आणि दीर्घ श्वसनाचे व्यायाम करू शकता. जेणेकरून अतिरिक्त ताण दूर होतो आणि मानसिक सह शारीरिक आरोग्य देखील सुधारते. 

नियमित पाण्याचे सेवन करा : 

आरोग्यासाठी पुरेश्या प्रमाणात पाण्याचे सेवन करणे अतिशय महत्वाचे असते. जर शरीरात पाण्याची कमतरता झाल्यास आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. पाणी शरीरातील दूषित घटक बाहेर काढण्यास मदत करते. दिवसभरात 8 ते 10 ग्लास पाणी प्यायला हवं. यामुळे तुमची त्वचा चमकदार होते आणि शरीर हायड्रेटेड सुद्धा राहते. ज्यामुळे शरीरात ताजेपणा येतो आणि एनर्जी मिळते. 

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)