Trending News: Husband Test हा सोशल मीडियावर व्हायरल होणारा ट्रेंड आहे. ज्यामध्ये महिला त्यांच्या बॉयफ्रेंडला 'नवरा' म्हणून हाक मारतात. यानंतर त्यांच्या बॉयफ्रेंडची रिऍक्शन अत्यंत महत्त्वाची ठरते. यावरुन हे नातं किती खास आहे? किंवा या नात्यात किती तथ्यता आहे, हे ओळखले जाते. या ट्रेंडने सध्या धुमाकूळ घातला आहे. या ट्रेंडवरुन आपल्या नात्यातील एकनिष्ठता ओळखणे योग्य आहे का? असा देखील प्रश्न उपस्थित होतो.
Husband Test या ट्रेंडची सुरुवात TikTok युझर्स @kkenziegreene च्या व्हिडिओने झाली. ज्यामध्ये ती तिच्या प्रियकराला 'Husband' म्हणते आणि तो लगेच तिला सुधारतो. या ट्रेंडने नातेसंबंधांमधील निष्ठा आणि बांधिलकी या विषयांवर चर्चा होत आहे. हा ट्रेंड सध्या खूप चर्चेत आहे.
सोशल मीडियावर चर्चेत येणाऱ्या या ट्रेंडमध्ये महिला आपल्या बायॉफ्रेंडशी जनरल गप्पा मारता. या गप्पांमध्ये त्या ओघाने बॉयफ्रेंडला Husband अशी हाक मारतात. आणि त्याच क्षणी बॉयफ्रेंडची असलेली पहिली रिऍक्शन कॅमेऱ्यात कैद करतात. काहीजण असे म्हणतात की, जर यावर तुमचा बॉयफ्रेंड हसला किंवा त्याने सकारात्मक पद्धतीने रिऍक्ट केलं तर तुम्ही योग्य व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये आहात. तसेच जर एखाद्या व्यक्तीने यावर नकारात्मक पद्धतीने रिऍक्ट केलं तर या नात्याचा तुम्ही पुन्हा एकदा विचार करायला हवा.
Husband Test या ट्रेंडवरुन सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. काहीजण म्हणतात की, अशा ट्रेंडच्या माध्यमातून नातं ओळखणं योग्य आहे का? कारण या नात्यांमध्ये किती तथ्यता आहे हे ओळखणे सोपे होते. कारण नातं अशापद्धतीने ओळखणे योग्य आहे का? कारण नातेसंबंध हे तुमच्या दोघांच्या विचारांवर अवलंबून असतं. सोशल मीडियावर अनेक ट्रेंड व्हायरल होत असतात. रिलेशनशिपबद्दल वेगवेगळे ट्रेंड तयार होतात. या ट्रेंडच्या माध्यमातून अनेकजण आपलं नातं तपासून पाहतात.
तू नवरा होण्यास तयार आहेस का?
तुला लग्न करायचं आहे का?
तुमच्या जोडीदाराशी पैशाबद्दल बोलणे तुम्हाला सोयीचे आहे का?
जोडीदाराने एकमेकांपासून गुप्तता ठेवली पाहिजे असे तुम्हाला वाटते का?
तुम्हाला असे वाटते की, तुम्ही वाद चांगल्या प्रकारे सोडवू शकता?