Ahmednagar Crime News : CID या क्राईम शो मध्ये कोणताही पुरावा नसताना CID ची टीम आरोपींचा छडा लावतात. CID पेक्षा भारी Investigation अमहमदनगरच्या राजूर पोलिसांनी केले आहे. एका महिलेच्या हत्या प्रकरणात कोणताही पुरावा नसताना पोलिसांनी एका सॅनिटरी पॅडवरुन खुनी शोधला आहे. पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील दुर्गम भागात एका अनोळखी महिलेचा मृतदेह सापडला होता. या महिलेची ओळख पटवण्यासोबतच तिची हत्या करणाऱ्याचा छडा पोलिसांनी लावला. एका सॅनेटरी पॅडमुळे पोलीसांना हे शक्य झाले आहे.
अमहमदनगरच्या राजूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कातळापूर परीसरात एका 25 वर्षीय महिलेचा मृतदेह काही दिवसांपूर्वी पोलीसांना आढळून आला होता. महिलेची हत्या झाल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले. या मृतदेहाती ओळख पोलिसांना पटली नाही. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेवून तो शवविच्छेदनासाठी पाठवला. या महिलेची हत्या झाल्याचे शवविच्छेदन अहवालात समोर आले. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरु केला.
महिलेच्या मृतदेहाजवळ पोलीसांना पर्समध्ये सॅनिटरी पॅड सापडले. यावरुन पोलिसांनी तपास सुरु केला. ही महिला राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील असून या महिलेचे नाव कल्याणी महेश जाधव असल्याचे पोलिसांना समजले. जिल्हा परिषदेच्या मदतीने पोलीसांनी या महिलेच्या घराता पत्ता तसेच इतर माहिती मिळवली. यानंतर पोलिसांनी थेट महिलेचे घर गाठले आणि तिच्या पतीला चौकशीसाठी ताब्यात घेतले.
आरोपीने आधी पोलिसांना उडवाउडीवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने पत्नीच्या हत्येची कबुली दिली. पत्नीवर असलेल्या अनैतिक संबधाच्या संशयावरून पती महेश जाधव आणी त्याचा भाचा मयूर साळवे यांनी खुन केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. पोलीसांनी दोघांनाही गजाआड केले असून पोलीसांनी केवळ सॅनेटरी पॅडच्या माध्यमातून केलेल्या तपासामुळे सर्वत्र कौतुक होत आहे.
मुंबई, ठाणे, नवी मुंबई त्याचबरोबर डोंबिवली शहरात घरफोड्या करून धुमाकूळ घालणाऱ्या दोघां सराईत चोरट्यांना डोंबिवली मानपाडा पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली आहे. युसुफ शेख आणि नौशाद आलम असे अटक करण्यात आलेल्या सराईत चोरट्यांची नावे आहेत. मौजमजा करण्यासाठी हे दोघे घरफोडया करायचे. या चोरट्यांकडून पोलिसांनी 200 ग्रॅम वजनाचे सोने, त्याचबरोबर 20 लाखांपेक्षा जास्त रोकड हस्तगत केली आहे. विशेषतः सकाळच्या वेळेस बंद घर हेरून त्या घरांमध्ये ते घरफोडी करून पोबारा करायचे.