Kolhapur : रात्रीच्या अंधारात अंबाबाईच्या मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया झाली कशी? शिवसेना रस्त्यावर

अंबाबाई देवीच्या मूर्तीवर गोपनीय रित्या रासायनिक संवर्धन केल्याप्रकरणी शिवसैनिक आज पुन्हा एकदा देवस्थान समितीला जाब विचारणार आहे. 

Updated: Sep 24, 2022, 01:15 PM IST
Kolhapur : रात्रीच्या अंधारात अंबाबाईच्या मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया झाली कशी? शिवसेना रस्त्यावर  title=

Kolhapur : नवरात्रोत्सवाच्या (navratri 2022) पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील श्री अंबाबाई देवीच्या (Ambabai Devi) मूर्तीवरून नव्या वादाला सुरवात झाली आहे. कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि देवस्थान समितीने गोपनीय रित्या आंबाबई देवीच्या मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया केल्याचे समोर आलंय. (chemical process done on the idol of ambabai Devi shiv sena question )

दरम्यान आज अंबाबाई देवीच्या मूर्तीवर गोपनीय रित्या रासायनिक (chemical process) संवर्धन केल्याप्रकरणी शिवसैनिक (shivsena) पुन्हा एकदा देवस्थान समितीला जाब विचारणार आहे. यासाठी शिवसैनिक देवस्थान समिती दाखल होणार आहे.  

प्रशासनाने देवीचे रासायनिक संवर्धन (chemical process) करताना कोणालाच का कल्पना दिली नाही? त्यावरून शिवसेना आक्रमक झाली असून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांना फैलावर घेतले. तुम्ही तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी शिवसेनेने केली.  

अंबाबाई देवीची मूर्ती सुस्थितीत नव्हती तर मग याची कल्पना भक्तांना का दिली नाही ? रासायनिक संवर्धन प्रक्रिया करायची होती तर रात्रीच्या अंधारात सीसीटीव्ही (CCTV) बंद करून रासायनिक संवर्धन प्रक्रिया का केली गेली ? असे अनेक प्रश्न शिवसैनिक (shiv sena) आज देवस्थान समितीला पुन्हा एकदा विचारणार आहेत. दरम्यान सर्व शिवसैनिक हे अर्ध शिवाजी पुतळा इथं जमले असून अंबाबाईचा जागर करत देवस्थान समितीच्या ऑफिस वर पोहचणार आहेत. याच ठिकाणी मर्दानी खेळ सादर देखील केले जात आहेत.

वाचा : 500 रुपयांची 'ही' नोट तुमच्याकडे आहे का? असेल तर तातडीने बॅकेत जा आणि...

शिवसैनिकांनी उपस्थित केलेले प्रश्न

1) आठ दिवसांपूर्वी नेमकं अस काय घडलं ज्यामुळे देवीच्या मूर्तीचे तातडीने संवर्धन करण्यात आल ?
2) देवीची मूर्ती सुस्थितीत नसेल तर मूर्ती बदलावी की त्याच मूर्तीचे संवर्धन करण्यासाठी तातडीने तज्ञ समिती गठीत करून मुर्तीचे सवर्धन नेमकं कस करावं याचा अभिप्राय घेवून कारवाई करावी अशी मागणी देखील शिवसैनिक करत आहेत.
3) ज्या दिवशी अंबाबाई देवीच्या मुर्तीवर रासायनिक सर्वधन झालं त्या दिवशी रात्रभर जिल्ह्या प्रशासनातील प्रमुख हे का बसून होते याचे उत्तरही द्यावे अस शिवसैनिक यांचे म्हणणे आहे.
4) मूर्ती दुखावल्यामुळे प्रशासनाने तातडीने मूर्तीचे संवर्धन केले. हे करत असताना मंदीरातील CCTV का बंद केले ? असा सवाल देखील शिवसैनिक विचारात आहेत.