मुख्यमंत्र्यांची बेरोजगार तरुण आणि शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी घोषणा

राज्यातील पोलीस विभागात लवकरच शंभर टक्के भरती केली जाईल... दोन टप्प्यांत ही भरती होईल, असं सांगतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीचे अर्ज भरले नाहीत, त्यांनाही कर्जमाफी दिली जाईल अशी घोषणा केली

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Feb 15, 2018, 11:21 PM IST
मुख्यमंत्र्यांची बेरोजगार तरुण आणि शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी घोषणा  title=

लक्ष्मीकांत रुईकर, झी मीडिया, बीड : राज्यातील पोलीस विभागात लवकरच शंभर टक्के भरती केली जाईल... दोन टप्प्यांत ही भरती होईल, असं सांगतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीचे अर्ज भरले नाहीत, त्यांनाही कर्जमाफी दिली जाईल अशी घोषणा केली

बीड येथे नारायणगड येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन फडणवीस यांच्या हस्ते झाले. पंकजा मुंडे यादेखील यावेळी उपस्थित होत्या. 

अर्ज न भरलेल्यांनाही कर्जमाफी! 

यावेळी, बोलताना फडणवीस यांनी आपल्या भाषणात कर्जमाफीचा लाभ मराठवाड्याला जास्त मिळाल्याचे सांगून चार हजार कोटी वितरित केल्याचे स्पष्ट केलं. 

काही शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा फॉर्म भरलाच नाही, अशा शेतकऱ्यांची यादी काढून त्यांनाही कर्जमाफीचा लाभ दिला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.

पोलीस दलात १०० टक्के भरती

राज्यात बेरोजगारांची जे मोर्चे निघाले त्याचीही दखल सरकारनं घेतल्याचं सांगत लवकरच पोलीस दलात १०० टक्के भरती होईल, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी तरुणांनाही दिलासा दिलाय.