चूक केली नाही त्यांनी घाबरु नये - देवेंद्र फडणवीस

 ईडीकडे तक्रारी असतील म्हणून छापे टाकले असतील असे फडणवीस म्हणाले. 

Updated: Nov 24, 2020, 12:05 PM IST
चूक केली नाही त्यांनी घाबरु नये - देवेंद्र फडणवीस

मुंबई : शिवसेना नेते प्रताप सरनाईक (Pratap Sirnaik) यांच्या घरावर ईडीने (ED) छापा टाकल्यानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  (Devendra Fadnavis) यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिलीय. ईडीकडे तक्रारी असतील म्हणून छापे टाकले असतील असे फडणवीस म्हणाले. ज्यांनी चूक केली नाही त्यांनी घाबरु नये असेही ते पुढे म्हणाले.

वीजबिल (Electricity Bill) मुद्द्यावरुन त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. थकबाकी त्यांच्याही काळात होती आमच्याही काळात होती. शेतकऱ्यांकडून बिल वसूल केलं जातंय अशी सावकारी पद्धत आमच्याकडे नव्हती असे ते म्हणाले. 

हे सरकार पडेल आणि आम्ही सरकार स्थापन करु असे विधान भाजप नेते रावसाहेब दानवेंनी केले होते. यावर देखील फडणवीसांनी भाष्य केलंय. आम्ही विरोधीपक्ष आहोत. ते काम आम्ही प्रामाणिकपणे करतोय. या राज्यात सक्षम विरोधी पक्षाची गरज आहे. नाहीतर हे सरकार जनतेची पिळवणूक करेल. आम्ही सत्तांतराकडे डोळे लावून बसलो नाहीत. ज्या दिवशी सरकार जाईल त्यादिवळी महाराष्ट्राला सक्षम पर्याय आम्ही देऊ असे ते म्हणाले. 

संजय राऊतांकडे कोणतं खातं नाही, त्यांच्या भावाकडेही कोणती जबाबदारी नाही. पक्षाच्या महत्वाच्या मिटींगला राऊत नसतात. सरकारचा नाकर्तेपणा झाकण्याचं काम राऊत करतात असा चिमटा देवेंद्र फडणवीसांनी काढला.