क्रेन दुर्घटनेप्रकरणी अजूनही गुन्हा दाखल नाही

पुणे जिल्ह्यातल्या निरा-भिमा नदीजोड प्रकल्पाच्या दुर्घटनेप्रकरणी १५ तास उलटून गेल्यानंतरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळंच अपघात झाल्याचं प्रत्यक्षदर्शींच म्हणनं आहे. 

Updated: Nov 21, 2017, 04:10 PM IST
क्रेन दुर्घटनेप्रकरणी अजूनही गुन्हा दाखल नाही title=

पुणे : पुणे जिल्ह्यातल्या निरा-भिमा नदीजोड प्रकल्पाच्या दुर्घटनेप्रकरणी १५ तास उलटून गेल्यानंतरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळंच अपघात झाल्याचं प्रत्यक्षदर्शींच म्हणनं आहे. 

मात्र अजूनही तपासच सुरू असल्याचं स्पष्टीकरण पोलिसांनी दिलंय. ठेकेदार आणि गोदावरी - मराठवाडा प्रकल्पाचे अधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे. मात्र, तपास करुन योग्य कारवाई केली जाईल. अशी माहीती पोलीसांनी दिली. या अपघातात तब्बल आठ मजुरांचा बळी गेलाय. मात्र प्रशासनाला अजूनही कारवाई करण्यासाठी जाग आलेली नाही. केवळ तांत्रिक बिघाडाचं कारण पुढं करत कारवाईला टाळाटाळ होत आहे का ? असा प्रश्न निर्माण झालाय. 

निरा –भिमा नदीजोड प्रकल्पाची क्रेन तुटून अपघात झालाय. या अपघातात आठ कामगारांचा मृत्यू झालाय. अकोले गावातील घटना आहे. क्रेनचे रोप तुटल्याने हा अपघात घडला आहे. तावशी ते डाळज दरम्यान काम सुरु असताना हा अपघात घडलाय. अपघातानंतर युद्धपातळीवर मदतकार्य सुरु आहे. मृतांच्या नातेवाईकांना २ लाखांची मदत जाहीर करण्यात आलीय.