close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

चार वर्षीय बालिकेवर अत्याचार, चौकीदारीचे काम करणाऱ्याला अटक

चार वर्षीय बालिकेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला अखेर पोलिसांनी अटक केली आहे.  

Updated: Jun 11, 2019, 10:28 PM IST
चार वर्षीय बालिकेवर अत्याचार, चौकीदारीचे काम करणाऱ्याला अटक

नागपूर : चार वर्षीय बालिकेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. भूषण डहाट असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून तो चौकीदारीचे काम करतो. धक्कादायक बाब म्हणजे ही घटना प्राथमिक शाळेच्या आवारात घडली आहे. पीडित मुलीच्या आईने पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदविली. घटनेची चौकशी आणि मुलीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी बलात्कार आणि लहान मुलांचे लैंगिक छळ असा गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली.

पीडित बालिकेची आई काचीमेट परिसरातील इमारतींमध्ये धुनी भांडी करण्याचा काम करते. लोकांच्या घरी काम करत असताना ती आपल्या ४ वर्षीय मुलीला परिसरात खेळायला सोडत असे. सध्या परिसरातील खासगी प्राथमिक शाळेला सुट्टी असल्याने परिसरातील सर्व मुले शाळेच्या आवारात खेळत असत. रविवारी दुपारी पीडित मुलगी शाळेच्या आवारात खेळत असताना आरोपी भूषण डहाट याने पीडित मुलीला एका खोलीत नेत तिला अश्लील चित्रफीत दाखविली. त्यानंतर भूषणने त्या मुलीसोबत अत्याचार केले. 

संध्याकाळी पीडित मुलीच्या कपड्यांवर काही खूणा पाहिल्यानंतर शंका आल्यामुळे तिच्या आईने मुलीला खोलात जाऊन विचारणा केली. तेव्हा भूषण डहाट याने तिच्यावर अत्याचार केल्याचे समोर आले. पीडित मुलीच्या आईने लगेच आरोपी भूषण डहाटला फोन करून विचारणा करण्याचे प्रयत्न केले असता आरोपी फोन बंद करून पळून गेला. 

सोमवारी परिसरातील नागरिकांच्या मदतीने पीडित मुलीच्या आईने पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदविली. घटनेची चौकशी आणि मुलीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी बलात्कार आणि लहान मुलांचे लैंगिक छळ असा गुन्हा दाखल केला.

चिमुकल्या मुलीवर अत्याचाराच्या घटनेमुळे नागपूर शहरात प्रचंड संताप निर्माण झाला होता. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपी भूषण डहाटला शोधून त्याला तात्काळ अटक केली.