Gatari Amavasya : आजच मारा नॉनव्हेजवर ताव! कारण 'या' दिवशी आहे गटारी अमावस्या

Gatari Amavasya : रविवार म्हणजे नॉनव्हेजवर ताव मारण्याचा वार. पण आजचा रविवार अधिक खास आहे. कारण आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गटारी अमावस्या साजरी केली जाणार आहे. 

नेहा चौधरी | Updated: Jul 16, 2023, 08:19 AM IST
Gatari Amavasya : आजच मारा नॉनव्हेजवर ताव! कारण 'या' दिवशी आहे गटारी अमावस्या title=
gatari amavasya 2023 in maharashtra sunday mutton and chicken recipes nonveg lovers

Gatari Amavasya : श्रावण सुरु होण्यापूर्वी येणारी अमावस्या ही खूप खास असते. महाराष्ट्राती तिला आषाढी अमावस्या (Ashadha Amavasya 2023), दीप अमावस्या  ( Deep Amavasya 2023) आणि गटारी अमावस्या असं म्हणतात. गुजरातमध्ये हरियाली अमावस्या ( Hariyali Amavasya 2023) , कर्नाटकात भीमाना अमावस्या (Bhimana Amavasya 2023) तर आंध्रप्रदेशात चुकाला अमावस्या असं म्हणतात. या आषाढी अमावस्येला दुहेरी योग जुळून आला आहे. सोमवारी ही अमावस्या असल्याने सोमवती अमावस्या साजरी केली जाणार आहे. 

हो सोमवारी म्हणजे 17 जुलैला अमावस्या आहे. त्यानंतर अधिक मास (Adhik Maas 2023) आणि श्रावण (Shravan 2023) सुरु होईल. महाराष्ट्रात श्रावण महिन्यात नॉनव्हेज वर्ज असतं. त्यामुळे गटारी अमावस्येला नॉनव्हेज प्रेमी चिकन, मटण, फिशवर मनसोक्त ताव मारतात. पण सोमवारी अमावस्या असल्याने आजच गटारी अमावस्या म्हणजे नॉनव्हेज खालं जाणार आहे. (gatari amavasya 2023 in maharashtra sunday mutton and chicken recipes nonveg lovers)

गटारी हा शब्द कुठून आला?

गटारी हा शब्द गतहारी या शब्दापासून निर्माण झाला आहे. गत म्हणजे मागे किंवा सोडलेला आणि हरी म्हणजे आहारी...या दोन शब्दापासून गताहारी अमावस्या हा शब्द निर्माण झाला आहे. पुढे बोलीभाषेत तो गटारी असा झाला. आता सर्रास गटारी अमावस्या हाच शब्द जणू काही प्रचलित झाला आहे. 

गटारी साजरा करण्यामागे कारण?

गटारी अमावस्या म्हणजे आषाढ अमावस्येपासून चातुर्मासात श्रावणात मांसाहार, कांदा लसूण अगदी दारु वर्ज्य असतं. शास्त्रीय नुसार पावसाळ्यात मासेमारी चार महिन्यांसाठी बंद असते. पावसाळ्यात प्राण्यांना रोगाची भीती असते. नॉनव्हेज हे पावसाळ्यात पचनास जड असतं. त्यामुळे अशावेळी वर्षभरातील आहार मागे सोडून सात्विक आहार खाल्ला जातो. त्यामुळे श्रावण महिन्याभर तर काही जण गणपती उठेपर्यंत नॉनव्हेज खात नाही. त्यामुळे गटारी अमावस्येला नॉनव्हेज प्रेमी विविध नॉनव्हेज पदार्थांचा आस्वाद घेतात. 

आज बनवा हे चमचमीत चिकन, मटन रेसिपी...

गावठी मटण रस्सा - Gavti Mutton Rassa

मटन बिर्याणी 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Get Curried (@getcurried)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Amit Singh (@amitgasm)

 

चिकनची हटके रेसिपी

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Get Curried (@getcurried)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Wayne Shen (@foodiechina888)