लाडकी बहिण योजनेबाबत राज ठाकरे यांचा खळबळजनक दावा

लाडकी बहिण योजनेबाबत राज ठाकरे यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आले आहे. राज ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. 

वनिता कांबळे | Updated: Oct 16, 2024, 11:22 PM IST
लाडकी बहिण योजनेबाबत राज ठाकरे यांचा खळबळजनक दावा title=

Maharashtra Assembly Elections 2024 :   विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच राज्यातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झालीय.  सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसतायेत. विशेषत: लाडकी बहिण योजनेवरून मविआचे नेते महायुतीवर टीका करत असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही महायुतीवर निशाणा साधला आहे. 

हे देखील वाचा... महाराष्ट्रात मोठा पक्षप्रवेश! तब्बल 1111 कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणजे पुष्पा अशी खिल्ली राज ठाकरेंनी भर सभेत उडवली होती.. मात्र आता राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा महत्त्वांकाक्षी योजना असलेल्या लाडकी बहिण योजनेबाबत खळबळजनक दावा केलाय.. लोकांना मोफत पैसे वाटल्यास राज्य कंगाल होईल असं भाकीत राज ठाकरेंनी वर्तवलंय. 

लाडकी बहीण योजनेला टच केलात तर लाडक्या बहिणी करेक्ट कार्यक्रम करतील असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी  दिलाय... तर लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नसल्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलंय.
राज ठाकरेंप्रमाणेच विरोधकांनीही महायुती सरकारला लाडकी बहीण योजनेवरुन लक्ष्य केलंय.  मात्र राज्यातील दीड कोटी पेक्षा जास्त महिलांना लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळतोय.  या योजनेला महिला आणि मुलींचा भरघोस प्रतिसाद देखील मिळताना दिसतोय. तेव्हा हाच प्रतिसाद महायुतीला मतांच्या रुपाने मिळेल का? ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवण्याचा ठाम निर्धार मनसेनं केलाय. विधानसभा निवडणूक आम्ही जिंकू आणि सत्ता आणू असा विश्वास मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी व्यक्त केलाय. लवकरच महाराष्ट्रभर दौरे सुर होणार असल्याचंही राज ठाकरेंनी सांगितलंय.