Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Vidhan Sabha Election) पार्श्वभूमीवर सर्व पक्षाचे नेते कामाला लागले आहेत. इच्छुक उमेदवार, जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी बैठकांवर बैठक होत आहे. त्यात सत्ताधारी सरकार एकापाठोपाठ निर्णय घेत सुटली आहे. अगदी रविवारच्या दिवशीही मंत्रीमंडळाची बैठक झाली. त्यात त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. अशी चर्चा रंगली आहे की, कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे.
कारण आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी मंत्रिमंडळाने सकाळी सकाळी 9.30 वाजता बैठक ठेवली आहे. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही असे संकेत दिलीय की, येत्या दोन तीन दिवसात आचारसंहिता लागू होणार असून दिवाळीनंतर विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशा स्थितीत अनेक पक्षांमध्ये इनकमिंग आणि आऊटगोईंग सुरु होणार आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक चढउतार पाहायला मिळत आहेत. अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. याच दरम्यान निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात एक किंवा दोन टप्प्यात मतदान होऊ शकते. मात्र एकाच टप्प्यात निवडणुका होण्याची शक्यता अधिक असल्याचेही सांगण्यात आले आहे.
23 सप्टेंबर : 24 निर्णय
30 सप्टेंबर : 38 निर्णय
4 ऑक्टोबर : 32 निर्णय
10 ऑक्टोबर : 38 निर्णय
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार जनतेला खूश करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे त्यांनी शासन निर्णयांचा धडाका लावल्याचा पाहिला मिळत आहे.
10 दिवसांत एकूण शासन निर्णय : 1291
1 ऑक्टोबर : 148 शासन निर्णय
2 ऑक्टोबर : शासकीय सुट्टी
3 ऑक्टोबर : 203 शासन निर्णय
4 ऑक्टोबर : 188 शासन निर्णय
5 ऑक्टोबर : 2 शासन निर्णय
6 ऑक्टोबर : शासकीय सुट्टी
7 ऑक्टोबर : 209 शासन निर्णय
8 ऑक्टोबर : 150 शासन निर्णय
9 ऑक्टोबर : 197 शासन निर्णय
10 ऑक्टोबर : 194 शासन निर्णय