धोक्याची घंटा : राज्यात कोरोनाचे ६७८ नवे रुग्ण, मृत्यूची संख्या ५२१ वर

राज्यातील आतापर्यंतची रूग्णसंख्या १२,२९६ वर पोहोचली

Updated: May 3, 2020, 10:32 PM IST
धोक्याची घंटा : राज्यात कोरोनाचे ६७८ नवे रुग्ण, मृत्यूची संख्या ५२१ वर  title=

मुंबई : राज्यात ६७८ नविन रूग्ण वाढले असून २७ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राज्यातील आतापर्यंतची एकूण रूग्णसंख्या १२,२९६ वर पोहोचली आहे. तर राज्यातील एकूण मृत्यूंची संख्या ५२१ वर पोहोचली आहे. राज्यात आज एकूण कोरोना बाधित १२१ रुग्ण बरे होऊन घरी गेल्याची दिलासादायक बातमी देखील समोर आली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भातील माहिती दिली.

राज्यात १ लाख ७४ हजार ९३३ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १२ हजार ६२३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आज राज्यात ३६ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण संख्या ५२१ आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील २७, पुणे शहरातील ३, अमरावती शहरातील २, तर वसई विरार मधील १, अमरावती जिल्ह्यामधील १ तर औरंगाबाद मनपामधील १ मृत्यू आहे. या शिवाय प. बंगालमधील एका जणाचा मृत्यू मुंबई येथे झाला आहे.

रुग्णांची आकडेवारी (कंसात मृत्यूंची आकडेवारी)

मुंबई महानगरपालिका: ८३५ (३२२)
ठाणे: ५७ (२)
ठाणे मनपा: ४६७ (७)
नवी मुंबई मनपा: २०४ (३)
कल्याण डोंबिवली मनपा: १९५ (३)
उल्हासनगर मनपा: ४
भिवंडी निजामपूर मनपा: २० (१)
मीरा भाईंदर मनपा: १३९ (२)
पालघर: ४४ (१)
वसई विरार मनपा: १४४ (४)
रायगड: २७ (१)
पनवेल मनपा: ४९ (२)
*ठाणे मंडळ एकूण: ९७०९ (३४८)*
नाशिक: ८
नाशिक मनपा: ३५
मालेगाव मनपा: २१९ (१२)
अहमदनगर: २६ (२)
अहमदनगर मनपा: १६
धुळे: ८ (२)
धुळे मनपा: १९ (१)
जळगाव: ३४ (११)
जळगाव मनपा: १२ (१)
नंदूरबार: १२ (१)
*नाशिक मंडळ एकूण: ३८९ (३०)*
पुणे:८० (४)
पुणे मनपा: ११८७ (९५)
पिंपरी चिंचवड मनपा: ७२ (३)
सोलापूर: ७
सोलापूर मनपा: १०८ (६)
सातारा: ३६ (२)
*पुणे मंडळ एकूण: १४९० (११०)*
कोल्हापूर: १०
कोल्हापूर मनपा: ६
सांगली: २९
सांगली मिरज कुपवाड मनपा: २ (१)
सिंधुदुर्ग: ३ (१)
रत्नागिरी: १० (१)
*कोल्हापूर मंडळ एकूण: ६० (३)*
औरंगाबाद:५
औरंगाबाद मनपा: २१५ (९)
जालना: ८
हिंगोली: ३७
परभणी: १ (१)
परभणी मनपा: २
*औरंगाबाद मंडळ एकूण: २६८ (१०)*
लातूर: १२ (१)
लातूर मनपा: ०
उस्मानाबाद: ३
बीड: १
नांदेड: ०
नांदेड मनपा: ४
*लातूर मंडळ एकूण: २० (२)*
अकोला: १२ (१)
अकोला मनपा: ३७
अमरावती: ३ (१)
अमरावती मनपा: २८ (९)
यवतमाळ: ७९
बुलढाणा: २१ (१)
वाशिम: २
*अकोला मंडळ एकूण: १८२ (१२)*
नागपूर: ६
नागपूर मनपा: १४० (२)
वर्धा: ०
भंडारा: १
गोंदिया: १
चंद्रपूर: ०
चंद्रपूर मनपा: ३
गडचिरोली: ०
*नागपूर मंडळ एकूण: १५१ (२)*
इतर राज्ये: २७ (४)
*एकूण: १२ हजार २९६ (५२१)*