मुंबई : रत्नागिरी येथील विमानतळाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. या विमानतळाचे अत्याधुनिकीरण करण्यात येत आहे. त्यासाठी सुमारे ३०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. आतापर्यंत धावपट्टीसाठी सुमारे १०० कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. धावपट्टीची चाचणी घेण्यात आली. तटरक्षक दलाच्या डार्नियर विमानाचे रत्नागिरीच्या धावपट्टीवर यशस्वी लँडिंग झाले. या धावपट्टीवर अजूनही काही चाचण्या घेण्यात येणार आहेत. केंद्र सरकारच्या रिजनल कनेक्टिव्हीटी स्किम अंतर्गत पहिल्या टप्प्यात रत्नागिरी विमानतळाचा समावेश झाला आहे.
रत्नागिरी विमान तळावरुन लवकरच विमान सेवा सुरु होण्याचा मार्ग मोकळा झालाय. काल तटरक्ष दलाच्या खास विमानाद्वारे चाचणी घेण्यात आली. यावेळी अनेक प्रमुख अधिकारी उपस्थित होते. विमानतळ धावपट्टीचे काम पूर्णत्वाकडे गेले आहे. तसेच अन्य कामे प्रगतीपथावर आहेत. रत्नागिरी विमानतळावरुन आकाशात झेपावण्याची रत्नागिरीकरांची स्वप्ने आता लवकरच सत्यात उतरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. तटरक्षक दलाच्या डार्नियर विमानाचे रत्नागिरीच्या धावपट्टीवर यशस्वी लँडिंग झाले. या धावपट्टीवर अजूनही काही चाचण्या घेण्यात येणार आहेत. केंद्र सरकारच्या रिजनल कनेक्टिव्हीटी स्किम अंतर्गत पहिल्या टप्प्यात रत्नागिरी विमानतळाचा समावेश झाला आहे. या विमानतळाचा केंद्रीय नागरी हवाई मंत्रालयाच्या उडान योजनेत समावेश करण्यात आला आहे.
या विमानतळामुळे रत्नागिरीचे नाव आंतराष्ट्रीय स्तरावर पोहोचणार आहे. कोट्यावधी रुपये खर्च करून अत्याधुनिक सोयीसुविधांनी सज्ज असणाऱ्या या विमानतळाचे काम आता पूर्णत्वास गेलेय. प्रवासी विमान वाहतुक सुरू झाल्यास रत्नागिरीतील नागरिकांना मुंबई, दिल्लीसह देशाच्या अन्य राज्यात जा ये करणे सोयीचे होणार आहे. रत्नागिरी येथील विमान तळाचे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी केंद्रीय विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभू, खासदार विनायक राऊत आणि आमदार उदय सांमत यांनी लक्ष घातले आहे.
दरम्यान, सागरी सुरक्षेच्या दृष्टीने हे विमानतळ महत्वाचे आहे. सर्व चाचण्या पूर्ण झाल्यावर संरक्षण मंत्रालयाकडून खासगी प्रवासी वाहतुकीसाठी परवानगी घेण्यात येणार आहे. त्यानंतर दोन महिन्यांत रत्नागिरीत खासगी विमान सेवा सुरू होईल व त्यामुळे रत्नागिरीकरांची अनेक वर्षांपासूनची हवाई सफरीची अपेक्षा पूर्ण होणार आहे.