रत्नागिरीत वायुदलाकडून मदतकार्य सुरु, लोकांच्या सुटकेसाठी हेलिकॉप्टर्स तैनात

रत्नागिरीत वायुदलाकडून पुरात फसलेल्या लोकांसाठी हेलिकॉप्टर्स तैनात करण्यात आले आहेत.

Updated: Jul 23, 2021, 05:30 PM IST
रत्नागिरीत वायुदलाकडून मदतकार्य सुरु, लोकांच्या सुटकेसाठी हेलिकॉप्टर्स तैनात title=

रत्नागिरी : महाराष्ट्रातील चिपळूण आणि खेड शहरात पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आयएएफला सूचना करण्यात आल्या. भारतीय वायुदलाचे हेलिकॉप्टरने मुंबईहून रत्नागिरीसाठी सायंकाळी उड्डाण घेतले आणि सायंकाळी 5 वाजता रत्नागिरीला दाखल झाले. खराब हवामानामुळे संध्याकाळी पुढील कार्यवाही करण्यास परवानगी नव्हती.

आज रत्नागिरी येथे तैनात असलेल्या हेलिकॉप्टरसह मुंबईहून दुसर्‍या एका हेलिकॉप्टरने उड्डाण घेतले. अंदाजे एक टन वस्तूंसह एनडीआरएफची टीमही वायुदलाने रत्नागिरीला रवाना केली.

सकाळी 11.35 वाजता रत्नागिरीहून एक हेलिकॉप्टर रवाना झाले आणि रत्नागिरीला परत येण्यापूर्वी दोन जणांची सुटका केली.

वायूदलाकडून मदत कार्यांसाठी दोन एमआय -1 व्ही आणि दोन एमआय -1 एस कार्यरत आहे. आणखी एक हेलिकॉप्टर कोणत्याही आपत्कालीन गरजेसाठी पुण्यात तयार ठेवण्यात आले आहे.