उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं नवीन चिन्ह प्रसिद्ध, पाहा पहिली झलक!

उद्धव ठाकरे गटाकडून निवडणूक चिन्ह प्रसिद्ध करण्यात आलंय.

Updated: Oct 10, 2022, 08:27 PM IST
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं नवीन चिन्ह प्रसिद्ध, पाहा पहिली झलक! title=

Shivsena symbol : केंद्रीय निवडणूक आयोगाने तात्पुरतं शिवसेनेचं धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह (shivsena symbol) गोठवलं. तसेच शिवसेना नावावर देखीलं बंदी घालण्यात आली. त्यानंतर आता नवीन चिन्हाबाबत ठाकरे आणि शिंदे गटात चिंतन सुरू असतानाच आता मोठी माहिती समोर आली आहे.

उद्धव ठाकरेंना आता 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' नाव मिळालं आहे. त्याचबरोबर एकनाथ शिंदेंना 'बाळासाहेबांची शिवसेना' असं नाव मिळालं आहे. तर उद्धव ठाकरे यांना मशाल हे चिन्ह देण्यात आलंय. 

अशातच आता उद्धव ठाकरे गटाकडून निवडणूक चिन्ह प्रसिद्ध करण्यात आलं आहे. पाहा पहिली झलक...

 

ShivSena_news_Symbol

निवडणूक आयोगाने ठाकरेंना मशाल चिन्ह दिलेलं आहे. ठाकरेंनी त्रिशुळ आणि उगवता सूर्य चिन्ह मागितलं होतं. पण निवडणूक आयोगाने उपलब्ध चिन्हांच्या यादीत ही चिन्हं नसल्याने संबंधित चिन्हं देण्यास ठाकरेंना नकार दिला. तर निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्याकडे चिन्हासाठी पर्याय मागितले आहेत.

उद्धव ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाकडे पर्यायी पक्षचिन्हांची यादी सादर करण्यात आली होती. यामध्ये त्रिशूळ, धगधगती मशाल आणि उगवता सूर्य या तीन चिन्हांचा समावेश होता. मात्र, त्यातील धगधगती मशाल चिन्ह ठाकरे गटाला मिळालं आहे. तर 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' नाव मिळालं आहे.

आणखी वाचा - BREAKING : निवडणूक आयोगाकडून ठाकरे गटाला मिळालं हे चिन्ह