Maharashtra Breaking News LIVE: आपल्यासमोर अदानींचं सुलतानी संकट : उद्धव ठाकरे
Maharashtra Breaking News LIVE: विधानसभा निवडणुकीचा प्रचार थंडावण्याआधीचा आजचा शेवटचा रविवार असल्याने आजचा दिवस हा सभा आणि प्रचाराच्या रणधुमाळीचा आहे. राज्याबरोबरच देशभरातील प्रमुख घडामोडींचे सर्व अपडेट्स अगदी संक्षिप्त स्वरुपात जाणून घ्या; दिवसभरातील ताज्या घडामोडींनी धावा आढावा...
'मी आता थोड्या दिवसांचा पाहुणा', मनोज जरांगेंच्या विधानाने खळबळ, म्हणाले 'माझं शरीर आता...'
मी आता थोड्या दिवसांचा पाहुणा आहे. माझं शरीर मला साथ देत नाही, अशी भाविनक साद मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) मराठा समाजाला घातली आहे.
खंडणींच्या आरोपानंतर मविआत खटके, मतदानावर होणार परिणाम?
Amaravati Vidhansabha: यशोमती ठाकुरांनी केलेल्या आरोपात तथ्य नाही. त्यांचे आरोप बिनबुडाचे असल्याचा पलटवार व-हाडे यांनी केलाय.
'साधंसुधं पाडू नका, असं पाडा की...', शरद पवारांचा कार्यकर्त्यांसमोर एल्गार; 'सर्वांचा नाद करायचा पण...'
सोलापुरातील टेंभुर्णीच्या प्रचार सभेत बोलताना, शरद पवारांनी विरोधकांना इशारा दिला आहे. सख्खे भाऊ असू द्या की कोणी असू द्या, यांना साधंसुधं पाडायचं नाही जोरात पाडायचं असं पवार म्हणाले आहेत.
नागपूरमध्ये प्रियांका गांधींच्या रोड शोमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा राडा
नागपूरमध्ये प्रियांका गांधींच्या रोड शोमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा राडा पाहायला मिळाला. नागपूरमध्ये काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने पाहायला आले आहेत. पोलिसांकडून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न सुरु आहे.
निवडणुकीच्या रणधुमाळीत अमित शाह अचानक महाराष्ट्र सोडून दिल्लीला रवाना! नेमकं काय झालं?
Amit Shah cancels Maharashtra rallies: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या आज अनेक प्रचारसभा होणार होत्या. मात्र अमित शाह अचानक दिल्लीली रवाला झाले आहेत.
नवनीत राणांच्या सभेत खुर्च्यांची तोडफोड, थोडक्यात बचावल्या; काय झालं नेमंक?
Navneet Rana Sabha Rada: या राड्यात नवनीत राणा थोडक्यात बचावल्या असून खुर्च्यांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली आहे.
बारामती टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून प्रतिभा पवारांना रोखलं; गेटवरच अडवली कार
शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार व त्यांची नात रेवती सुळे यांना बारामतीतील टेक्सटाइल पार्कमध्ये जाण्यापासून रोखण्यात आलं. तब्बल अर्धा तास त्यांना गेटवर थांबवून ठेवण्यात आलं असा दावा सुप्रिया सुळे यांच्या कार्यालयाकडून करण्यात आला आहे.
मी सालाने ठेवलेला गडी आहे का? अजित पवारांचा गावकऱ्यांना प्रश्न; नेमकं घडलं तरी काय?
Maharashtra Assembly Election Ajit Pawar Angry: अजित पवार हे त्यांच्या रोखठोक आणि बेधडक विधानांसाठी ओळखले जातात. आज त्यांनी दोन गावांना भेट दिली. यावेळी गावकऱ्यांशी संवाद साधताना आपल्या मनातील खदखद व्यक्त केली.
'मी साहेबांना सोडलेलं नाही, सगळ्याच...'; शरद पवारांबद्दल अजित पवारांनी केलेल्या विधानाने खळबळ
Maharashtra Assembly Election Ajit Pawar: अजित पवार आज प्रचाराच्या शेवटच्या रविवारी काही गावांच्या दौऱ्याबरोबरच काही जाहीर सभा घेत प्रचार दौऱ्यावर आहेत. यापैकीच एका गावामध्ये बोलताना त्यांनी शरद पवारांबद्दल विधान केलं आहे.
VIDEO : महायुतीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात येताच पवन कल्याण यांचे मराठीत भाषण
Pawan Kalyan Marathi Speaking : पवन कल्याण यांनी महाराष्ट्रात येताच केलं मराठीमध्ये भाषण, अस्खलित मराठीतील व्हिडीओमुळे एकच चर्चा
'...तर हुतात्मा स्मारकावर अदानींचा टॉवर असेल, विकास झाला म्हणत...'; मोदी-शाहांचं नाव घेत राऊतांचा टोला
Maharashtra Assembly Election: महाराष्ट्रातील निवडणुकीत भाजप-शिंदे-अजित पवार हे पैशांचा पाऊस पाडत आहेत. हा सर्व पैसा कोठून येतो? ते रहस्य आता राहिलेले नाही, असंही संजय राऊतांनी म्हटलेलं आहे. त्यांनी मोदी, शाह, अदानींवरही निशाणा साधला आहे.
बाळासाहेब ठाकरेंबाबत अमित शाहांना भलताच पुळका आला आहे, पण...; राऊतांचा हल्लाबोल
Maharashtra Assembly Election Sanjay Raut: "शिंदे व अजित पवार गटाच्या उमेदवारांना निवडणूक खर्चासाठी 25-30 कोटी रुपये सहज पोहोचले व निवडणूक आयोगाची तपासणी पथके उद्धव ठाकरे यांचे हेलिकॉप्टर रोखून बॅगा तपासत बसली," असा टोला राऊतांनी लगावला.
'कंटेंगे तो बटेंगे', 'एक है तो सेफ है'वर CM शिंदे स्पष्टच बोलले! म्हणाले, 'मोदीजींनी कुठे...'
Maharashtra Assembly Election: महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मागील काही दिवसांपासून दोन घोषणांची फारच चर्चा दिसून येत आहे. पहिली म्हणजे 'कंटेंगे तो बटेंगे' आणि दुसरी घोषमा 'एक है तो सेफ है'. या घोषणांचा नेमका अर्थ् काय हे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
राज ठाकरेंच्या 'फडणवीस मुख्यमंत्री होणार' विधानावर शिंदे पहिल्यांदाच बोलले! 4 शब्दांत उत्तर
Maharashtra Assembly Election CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंनी 'फडणवीस मुख्यमंत्री होणार' या विधानावरही आपलं मत व्यक्त केलं आहे. त्याचबरोबर सरवणकरांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याबद्दलही ते बोलले आहेत.
आज प्रचाराचा Super Sunday... कुठे, कोण आणि किती वाजता घेणार जाहीर सभा एकदा पाहाच
Maharashtra Assembly Election: प्रचारला पूर्णविराम लागण्याआधीचा शेवटचा रविवार असल्याने आज दिवसभर राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये नेत्यांच्या जाहीर सभा होत असून दिल्लीतील मोठे नेतेही आज राज्यात दाखल झालेत. कोणाची कुठे आणि किती वाजता सभा आहे पाहूयात...
Maharashtra Weather Update : चक्रीवादळाचा राज्यावर परिणाम; 'या' जिल्ह्यात पावसाची शक्यता
चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावर होताना दिसत आहे. राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
'...त्यात एक नाव फडणवीसांचे होते'; मृत व्यक्तीच्या संपत्तीचा उल्लेख करत राऊतांचा खळबळजनक दावा
Maharashtra Assembly Election Sanjay Raut Slams Devendra Fadnavis: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला एक दावा फारच हस्यास्पद असल्याचा दावा उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते तसेच खासदार असलेल्या संजय राऊत यांनी केला आहे.
राष्ट्रवादी शरद पवार पक्षला चकवा देण्यासाठी भाजपने पिपाणीवाले 163 उमेदवार रिंगणात उतरवले; सुप्रिया सुळेंचा आरोप
Supriya Sule : चार वेळा तुम्हाला उपमुख्यमंत्री केलं...अजित पवारांच्या टीकेला सुप्रिया सुळेंनी उत्तर दिलंय..
ठाण्यात गोंधळ; उद्धव ठाकरेंच्या सभेचा स्टेज खचला
Uddhav Thackeray : ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभा संपल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा स्टेज कोसळला.