मुंबई : राज्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. राज्यात दिवसभरात कोरोनाचे 145 रुग्ण वाढले आहेत. राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 635 वर पोहचली आहे. तर आतापर्यंत राज्यात कोरोनाचे 32 बळी गेले आहेत. राज्यात आतापर्यंत 52 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यापैकी मुंबईत सर्वाधिक 377 रुग्ण आहेत.
मुंबईत आतापर्यंत 377 रुग्ण आढळले असून 22 जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्यात 82 कोरोनाबाधित असून 2 जणांचा मृत्यू झाला आहे. सांगलीत 25 रुग्ण, नागपूर, अहमदनगरमध्ये प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे.
लातूरमध्ये 7 रुग्ण, बुलढाणामध्ये 5 रुग्ण आढळले असून एकाचा मृत्यू झाला आहे. यवतमाळमध्ये 4 रुग्ण आढळले आहेत.
सातारा, औरंगाबाद आणि उस्मानाबादमध्ये प्रत्येकी 3 रुग्ण, तर कोल्हापूर, रत्नागिरी आणि जळगावमध्ये प्रत्येकी 2 रुग्ण आढळले आहेत.
सिंधुदुर्ग, गोंदिया, नाशिक, वाशिम, अमरावती, हिंगोलीमध्ये प्रत्येकी 1 कोरोना रुग्ण आहेत.
भारतात कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढत आहे. भारतात आतापर्यंत 3000हून अधिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर देशात 75 जणांचा मृत्यू झाला आहे.