एलफिन्स्टन चेंगराचेंगरी : मृतांच्या नातेवाईकांना १० लाखांची मदत

परळ-एलफिन्स्टन दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून आणि रेल्वे मंत्रालयाकडून प्रत्येकी ५ लाख रूपये अशी १० लाखांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Sep 29, 2017, 04:12 PM IST
एलफिन्स्टन चेंगराचेंगरी : मृतांच्या नातेवाईकांना १० लाखांची मदत title=

मुंबई : परळ-एलफिन्स्टन दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून आणि रेल्वे मंत्रालयाकडून प्रत्येकी ५ लाख रूपये अशी १० लाखांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.

दरम्यान, येत्या १५ दिवसांत मुंबईतील धोकादायक वाटणाऱ्या पुलांची पाहणी करुन त्याचे ऑडीट केले जाईल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेय. या दुर्घटनेला रेल्वे जाबाबदार असल्याचा आरोप प्रवाशांनी केलाय.

मध्य रेल्वेचे परळ स्टेशन आणि पश्चिम रेल्वेचं एलफिन्स्टन स्टेशन यांना जोडणाऱ्या पुलावर आज सकाळी चेंगराचेंगरी होऊन २२ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. 

 
या अपघातात १८ पुरूष आणि ४ महिलांचा मॄत्यू झाल्याची माहिती आहे. तर ३५ जण जखमी झाले आहेत. मॄतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.