coronavirus : कोणत्या जिल्ह्यात किती कोरोना रुग्ण?

महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांमध्ये एकही कोरोना रुग्ण आढळला नाही.

Updated: Apr 11, 2020, 11:29 PM IST
coronavirus : कोणत्या जिल्ह्यात किती कोरोना रुग्ण? title=
संग्रहित फोटो

मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसागणित वाढ होत आहे. आता राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 1761वर पोहचली आहे. शनिवारी राज्यात एका दिवसांत 187 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर शनिवारी एकाच दिवसांत 17 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. 

शनिवारी मुंबईत 12, पुणे 2, सातारा 1, धुळे 1 आणि मालेगावात एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 127वर गेली आहे.

राज्यात आतापर्यंत 208 जण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यापैकी एकट्या मुंबईत 1146 जण कोरोनाबाधित आढळले आहेत. तर मुंबईत आतापर्यंत 76 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

ठाण्यात 6 तर ठाणे मनपात 29 कोरोनाग्रस्त आढळले आहेत. ठाणे मनपातील 3 जणांचा मृत्यू झाला आहे. 

पुणे 7 तर पुणे मनपात 228 जण कोरोनाबाधित आढळले असून 27 जणांचा मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड मनपात 22 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

नवी मुंबईत 36 जणांना कोरोनाची लागण झाली असून 2 जणांचा मृत्यू झाला आहे. पनवेल मनपात 7 कोरोनाग्रस्त असून एक जण दगावला आहे. तर कल्याण-डोंबिवलीत 35 कोरोनाबाधित असून दोघांचा मृत्यू झाला आहे. 

मीरा-भाईंदरमध्ये 36 जण कोरोनाग्रस्त असून एकाचा मृत्यू झाला आहे. पालघरमध्ये 4 जणांना लागण झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे. वसई-विरारमध्ये 14 जण कोरोना पॉझिटिव्ह असून तिघांचा बळी गेला आहे.

नाशिक 2, नाशिक मनपा 1, अहमदनगर 10, अहमदनगर मनपा 16, जळगाव 1, कोल्हापूर 1, कोल्हापूर मनपा 5, सांगली 26, सिंधुदुर्गमध्ये 1, लातूर मनपा 8, उस्मानाबाद 4, बीड 1, अकोला मनपा 12, यवतमाळ 4, वाशिम 1, गोंदियामध्ये 1 कोरोनाबाधित आढळला आहे.

मालेगावमध्ये 11 कोरोनाबाधित असून दोघांचा मृत्यू झाला आहे. तर धुळे आणि जळगाव मनपामध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. 

तर धुळे मनपा, नंदुरबार, सोलापूर, परभणी, नांदेड, अमरावती, नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नाही.