म्हाडा मोकळ्या जागा विकत घेऊन मुंबई, ठाण्यात परवडणारी घरं उभारणार

 गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे मुख्यमंत्री आणि शरद पवारांशी चर्चा करणार 

Updated: Sep 14, 2020, 04:59 PM IST
म्हाडा मोकळ्या जागा विकत घेऊन मुंबई, ठाण्यात परवडणारी घरं उभारणार title=

दीपक भातुसे, मुंबई : म्हाडा मोकळ्या जागा विकत घेऊन मुंबई आणि ठाण्यात परवडणारी घरं उभी करणार आहे. म्हाडा टागोर नगर, कन्नमवार नगर सारख्या मोठ्या वसाहती उभ्या करणार आहे. याबाबत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे मुख्यमंत्री आणि शरद पवारांशी चर्चा करणार आहेत. उपनगरात काही जमिनी उपलब्ध आहेत त्या ताब्यात घेता येतील.

उपनगरातील काही कंपन्यांच्या जमिनी वादात आहेत. त्या घेता येतील आणि परवडणारी घरं मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देता येतील. तसेच म्हाडाने ३० ते ४० वर्षांपूर्वी कन्नमवार नगरसारख्या मुंबईत ५६ म्हाडाच्या वसाहती उभ्या केल्या आहेत. ठाण्यात कंपन्यांची शेकडो एकर जमिनी न्यायालयीन वादात अडकली आहे, त्या जमीनी ताब्यात घेऊन स्वस्त घरं उभी करणार असल्याचं आव्हाड यांनी म्हटलं आहे.